Saturday, July 3, 2021

घरफोडीत दीड लाख लंपास


 नगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार


कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात केतन पार्क येथून घराची लोखंडी ग्रील तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.


शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे महेश सिताराम मोहारे राहणार शिवाजीनगर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 80 हजार रुपये रोख असा एक लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



No comments:

Post a Comment