Friday, April 15, 2022

चिचोंडी पाटील ता.नगर येथे हनुमान जयंती यात्रा उत्सव

 


चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील या ऐतिहासिक गावांमध्ये हनुमान जयंती निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 


कोरोणा च्या महामारी मध्ये दोन वर्ष यात्रेवर कोरोणाचे सावट होते परंतु शासनाने सर्व निर्बंध हटवल्याने या वर्षी चिचोंडी पाटील येथील भाविकांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे वर्गणी जमा करून मोठ्या उत्साहात यात्रा करण्याचे ठरवले आहे. या यात्रेचे नियोजन यात्रा कमिटीने उत्कृष्टपणे केले आहे.


शनिवार दिनांक १६.४.२०२२ रोजी मारुती मंदिरा मध्ये सूर्योदयाच्यावेळी हनुमान जन्मोत्सव, सकाळी ७: ३० वाजता कावडी मिरवणूक, सायंकाळी ७ ते ११ छबिना पालखी मिरवणूक व शोभेचे दारूकाम दुसऱ्या दिवशी रविवार दिनांक १७.४.२०२२ रोजी सकाळी ९ वाजता हजेरीचा कार्यक्रम, दुपारी १२ ते ३ झणझणीत वांग व गरमागरम भाकरीचा महाप्रसाद होणार आहे.


 दुपारी ३ वाजता जंगी कुस्त्यांचा हंगामा, कुस्त्यांच्या हंगामाचे स्थळ मारुती मंदिरा मागे वाळूचा मळा,चिचोंडी पाटील तालुका नगर. कै पै रामराव दादा पवार यांच्या स्मरणार्थ चिचोंडी पाटील केसरी दोन हजार बावीस प्रथम पारितोषिक चांदीची गदा हे खास आकर्षण महिलांसाठी असणार आहे.


या कुस्त्याच्या हंगामासाठी महाराष्ट्रातील नामवंत मल्ल यांची उपस्थिती राहणार आहे.रात्री ८:३० ते ११ वाजता न्यू इंग्लिश स्कूल चिचोंडी पाटील मैदानात, रंगमंच मराठी कलेचा,स्वराधिन पुणे निर्मित आर्केस्ट्रा, इत्यादी सर्व कार्यक्रमाचे उत्कृष्टपणे आयोजन सर्व हनुमान भक्त व चिचोंडी पाटील यात्रा कमिटी यांनी आयोजन केले आहे.


यात्रेमध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी नगर तालुका पोलिस स्टेशनचे कर्मचारी बारकाईने लक्ष ठेवून आहेत.


यात्रेमध्ये काही अनुचित प्रकार घडल्यास संबंधितांची गय केली जाणार नाही. त्यासाठी सर्वांनी आपल्या गावची यात्रा शांततेत पार पाडावी.


यात्रेत कसलेही गालबोट लागणार नाही याची काळजी सर्व भक्तांनी घ्यावीअसे आवाहन नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप व पोलीस कर्मचार्‍यांनी केले आहे.


तरी सर्व चिचोंडी पाटील पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी व यात्रा प्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment