Tuesday, April 12, 2022

विजेवर तोडग्यासाठी सौरऊर्जेचा वापर करावा. सुधीर भद्रे यांचे मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना पत्र

 


चिचोंडी पाटील  (प्रतिनिधी) : सोहेल मनियार


वीज भारनियमनावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष श्री .सुधीर भद्रे यांनी मा .मुख्यमंत्री व मा . पंतप्रधान यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे .


दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा गरजेच्या वेळी म्हणजे  सणावारांना आणि उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भारनियमन केले आहे . सध्या तर कोयना धरणा मध्ये 17 टीएमसी पाणी उपलब्ध असून हे पाणी वीज निर्मितीसाठी फक्त 17 दिवसच पुरेल .


अशीच परिस्थिती कोळसा कमी असल्यामुळे औष्णिक वीज निर्मिती केंद्रांना विज निर्माण करण्यासाठी त्रासदायक आहे .महाराष्ट्राला 28 हजार 700 मेगावॅट विजेची गरज असून जून पर्यंत 30 हजार मेगावॅट वीज लागेल .


महावितरण कडे सध्या चार हजार मेगावॅट वीजेचा तुटवडा भासत आहे  .वीज निर्मिती केंद्र सुद्धा अडचणीत असल्यामुळे वीज विकत मिळणे कठीण आहे .भारनियमनामुळे शेतक-यांसह ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक त्रस्त आहेत .


भारनियमनावर तातडीचा उपाय म्हणून महाराष्ट्र शासन गुजरात मधुन 760 मेगावॅट वीज खरेदी करणार आहे . हा प्रकार म्हणजे कर्जाचे व्याज भरण्यासाठी कर्ज काढण्यासारखाच आहे . 


वाढते वीजबिल व त्यावर कळस म्हणजे मोबदला देऊनही वीज उपलब्ध होत नसल्यामुळे  वीज ग्राहक त्रस्त आहेत . वीज वितरण कंपनीचे कर्मचारी - अधिकारी आणि लोकप्रतिनिधी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात नियोजन चुकल्यामुळे नियमितपणे जनतेच्या रोषाला पात्र ठरत आहेत .           शेतकऱ्यांचे तर संपूर्ण जीवनच शेतीवर असल्यामुळे वीज नसली तर अनेक शेतकऱ्यांना पीक उत्पन्नामध्ये फटका बसून कर्जबाजारी व्हावे लागले आहे काहींना तर दुर्दैवाने आत्महत्या सुद्धा करावी लागली आहे इतके विजेला  शेती क्षेत्रामध्ये महत्व प्राप्त झाले आहे .ग्रामीण व शहरी भागातील वीज नसली तर सामान्य जनतेला अतोनात त्रास होतो विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही पर्यायाने उद्याच्या भारताचे भविष्य असणारे विद्यार्थी कमजोर होतील . अशाच प्रकारे दुग्ध व्यवसायिक, हॉटेल व्यवसायिक, एम. आय. डी. सी.,यांच्यासोबतच सर्वच व्यवसायिक भारनियमनामुळे तोट्यात येतात .


यावर थोडा खर्चिक परंतु नैसर्गिक आणि कायमस्वरूपी उपाय म्हणून सौर ऊर्जेकडे पाहावे अशी मागणी श्री . सुधीर भद्रे यांनी केली आहे .         महाराष्ट्र राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने कुठल्याही अटी न ठेवता प्रत्येक गावातील प्रत्येक  शेतकऱ्याला व शहरी तथा ग्रामीण भागात  सौर ऊर्जेसाठी अनुदान दिले तर विजेचा प्रश्न नक्कीच सुटेल .


यामुळे सौर ऊर्जा प्रकल्प युद्धपातळीवर राबवावेत अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ कारभारी गवळी , श्री .अशोक सब्बन , विर बहादुर प्रजापती, अशोक ढगे ,भगवान जगताप, परदेशी आदींनी मा . मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व मा. पंतप्रधान, भारत सरकार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.



No comments:

Post a Comment