विविध विकास कामाचा शुभारंभ करताना सरपंच संगीता कांबळे,उपसरपंच बाबासाहेब काळे समवेत उपस्थित मान्यवर..(छाया:सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील(प्रतिनिधी):-
नगर तालुक्यातील दशमीगव्हाण येथे १४ वित्त आयोग मार्फत दलित वस्ती सुधार निधीतुन पाणीपुरवठा योजना तसेच बंदिस्त गटार योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
त्याचबरोबर दशमीगव्हाण येथील विविध विकास कामांनबाबत पाठपुरवठा करून त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध केला जाईल असे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उद्धव कांबळे यांनी केले.
दशमीगव्हाण येथे पाणीपुरवठा योजना व बंदिस्त गटार योजनेच्या कामाचा शुभारंभ सरपंच संगीता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना संगीता कांबळे यांनी गावातील विकास कामांबाबत माहिती देत यापुढेही विकासकामांसाठी पावले उचलली जातील.
नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामपंचायत मधील सर्व सभासद व पदाधिकारी नेहमी तत्पर असतील असे मत व्यक्त केले.
यावेळी उपसरपंच बाबासाहेब काळे, सूर्यकांत काळे, जयसिंग काळे, शिवाजी काळे, विजय काळे, लक्ष्मण काळे, पोपट काळे ,भाऊसाहेब काळे, साईनाथ काळे, काशिनाथ काळे, व ग्राम विकास अधिकारी शशिकांत शेळके उपस्थित होते.








No comments:
Post a Comment