Friday, April 1, 2022

सुनील गोसावी यांच्या 'आठवणींचा डोह'चे प्रकाशन


सुनील गोसावी यांच्या 'आठवणींचा डोह'चे प्रकाशन

अहमदनगर(प्रतिनिधी):-

शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील गोसावी यांच्या 'आठवणींचा डोह पुस्तकाचे प्रकाशन दि.२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता कोहिनूर मंगल कार्यालय,


 पाईपलाईन रस्ता येथे आमदार कविवर्य लहू कानडे, आदर्श गाव संकल्प व प्रकल्प योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार, ज्येष्ठ कामगार नेते, विचारवंत कॉम्रेड डॉ.भालचंद्र कांगो, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर,


 स्नेहालयचे प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी, नारायणगाव येथील साहित्यिक, समीक्षक प्रा. डॉ. मिलिंद कसबे, ज्येष्ठ कादंबरीकार, शिक्षक नेते डॉ. संजय कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती 'शब्दगंध'चे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.

सर्व साहित्यिक व रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे, कार्याध्यक्ष सुभाष सोनवणे, कार्यवाह प्रा. डॉ. अशोक कानडे, खजिनदार भगवान राऊत, ज्ञानदेव पांडुळे किशोर डोंगरे, राजेंद्र पवार,

शाहिर भारत गाडेकर, प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे, स्वाती ठुबे, कवयित्री शर्मिला गोसावी, बबनराव गिरी, रामकिसन माने, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर आदींनी केले आहे.






No comments:

Post a Comment