डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी व आयआयटी खरगपुर यांच्या संयुक्त विद्यमाने झोनल सेंटर कार्यशाळा प्रमाणपत्र प्रशिक्षण संपन्न झाले. याप्रसंगी मार्गदर्शक डॉ.सुधाकर बंगेरा, डॉ.करीशेट्टी बसप्पा, प्रा.अनुराधा चव्हाण, प्रा.सुरेखा बारवाल, प्रा. रोशनी सूर्यवंशी, डॉ.रेखाराणी खुराणा आदि. (छाया : विजय मते)
नगर - प्रतिनिधी
प्रत्येक विद्यार्थ्याला आपले करिअर घडविण्यासाठी जीवनात चांगल्या उच्च पदावर जाण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम व जिद्द यांची सांगड घालून विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांना अनेक संधी उपलब्ध आहे.
नोकरी करणारांसाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये तज्ञांची आवश्यकता असते तसेच स्वत:चा व्यवसाय करु इच्छित असाल तर त्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. यासाठी आपण फार्मसी क्षेत्रातील तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन हैद्राबादच्या प्रोफेशनल क्लिनिकल रिसर्च सेंटरचे तज्ञ डॉ.सुधाकर बंगेरा यांनी केले.
सेवा शिक्षण प्रसारक मंडळाच्या डॉ.ना.ज.पाउलबुधे कॉलेज ऑफ फार्मसी व आयआयटी खरगपुर यांच्या संयुक्त विद्यमाने झोनल सेंटर कार्यशाळा प्रमाणपत्र प्रशिक्षण कार्यक्रम फार्माकोव्हीजीलन्स नुकतेच कॉलेजमध्ये संपन्न झाले.
यप्रसंगी हैद्राबादच्या प्रोफेशनल क्लिनिकल रिसर्च सेंटरचे तज्ञ डॉ.सुधाकर बंगेरा यांनी फार्माकोव्हीजीलन्सबद्दल पायाभूत आणि करिअर विषयी व कर्नाटकचे प्रोफशनल ट्रेनर क्लिनिक रिसर्च फार्माकोव्हीजन्सचे डॉ.करीशेट्टी बसप्पा यांनी फार्मसी विषयक मेडिकल कोडिंगबद्दल सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.
या कार्यशाळेत 49 विद्यार्थी सहभागी झाले होते. यातील गुणवंत विद्यार्थ्यांची आयआयटी खरगपुर या ठिकाणी होणार्या अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली.
कर्यक्रमाचे नियोजन प्रा.अनुराधा चव्हाण, प्रा.सुरेखा बारवाल, प्रा. रोशनी सूर्यवंशी यांनी केले.
त्यांना संस्थेचे अध्यक्ष विनय पाउलबुधे व पदाधिकारी तसेच बी.एड्. कॉलेजच्या प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रणाली अनमल यांनी केले तर आभार प्रा.भक्ती बिडवे यांनी मानले.










No comments:
Post a Comment