Friday, April 29, 2022

१ कोटी ९७ लक्ष रुपयांचा निधी मंजूर ; सरपंच मनोज कोकाटे यांच्या प्रयत्नांना यश ; जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चिचोंडी पाटीलचा होणार कायापालट

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनिया


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत महत्वकांक्षी अशी समजली जाणाऱ्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत चिचोंडी पाटील गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी १ कोटी ९७ लक्ष रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला.


यामुळे निश्चितच चिचोंडी पाटील गावचा कायापालट होणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष तथा चिचोंडी पाटील गावचे सरपंच मनोज कोकाटे यांनी दिली.


यावेळी बोलताना कोकाटे यांनी सांगितले की, चिचोंडी पाटील गावासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना सण २००५ साली कार्यन्वित झाली. सदर योजनेतून वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठा व्हावा, सद्य परिस्थितीच्या लोकसंख्येचा विचार करून योजनेमध्ये सुधारणा व्हावी 


तसेच पाण्याची साठवण क्षमता वाढवावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थांची होती. त्याच मागणीचा विचार करून ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतने खासदार डॉ.सुजय विखे पाटील व आमदार श्री.बबनराव पाचपुते यांच्याकडे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध व्हावा 


अशी विनंती केलेली होती. त्याच मागणीनुसार व ग्रामपंचायतच्या सततच्या पाठपुरवठ्यामुळे सदर निधी मंजूर झाला असल्याचे प्रतिपादन यावेळी कोकाटे यांनी केले.


सदर निधीतून गावामध्ये दोन अतिरिक्त पाण्याच्या टाक्या, प्रत्येक वाडी व वस्तीवर पाणी पुरवठा योजना व सध्याच्या फिल्टर प्लांट मध्ये सुधारणा होणार असून यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढणार असून पाणी पुरवठा होण्याचा कालावधी कमी होणार असल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 


सदर निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल खासदार डॉ.सुजयदादा विखे पाटील, आमदार श्री.बबनराव पाचपुते, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.आनंद रुपनर, श्री.हजारे, श्री.गोरे, श्री.सोनार, श्री.येवले, ग्रामविकास अधिकारी श्री.मोरे या सर्वांचे सरपंच मनोज कोकाटे यांनी ग्रामस्थांच्या वतीने आभार व्यक्त केले.



No comments:

Post a Comment