Saturday, June 11, 2022

चक्रीवादळाने शेडनेट, झाडे,फळबागा जमीनदोस्त ; शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर ; भरपाई ची मागणी अन्यथा आत्महत्येचा इशारा

 


चक्रीवादळाच्या तडाख्यात जमिनदोस्त झालेले शेडनेटमधील लाखो रुपयांचेमिरची चे पीक (छाया : सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)

आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथे चक्री वादळाने थैमान घातले .यामध्ये शेतकऱ्यांची शेडनेट, पॉलिहाऊस, आंब्याची झाडे, डाळिंबाची बाग जमीनदोस्त झाली आहे.


लाखो रुपयांची पिकाचे नुकसान झाले असून शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा शेतकर्यांनी दिला.


नांदूर विठ्ठलाचे येथील शेतकरी उद्धव राजाराम विधाते यांनी आठ वर्षांपूर्वी अर्धा एकर जागेत शेडनेट हाऊस केले होते. त्यावेळी १० लाख रुपये खर्च आला होता.


सदर शेडनेटमधे मिरचीचे ५४०० रोपांची लागवड केली होती.प्रत्येक झाडाला साधारणपणे २ ते ३ किलो मिरची आली होती.पीक ऐन जोमात असताना चक्रीवादळाचा तडाखा बसून मिरची चे संपुर्ण पीक जमीनदोस्त झाले आहे. 


मिरची चे १० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.तरी शासनाने नुकसान भरपाई देऊन मदत करावी अशी मागणी उध्दव राजाराम विधाते यांनी केली.


परिसरातील शेतकरी  दत्तात्रय विधाते, उध्दव विधाते,राजाराम विधाते, नितीन विधाते यांचे शेडनेट पॉलिहाऊस चे नुकसान झाले.फळबाग शेतकरी अतुल खिळदकर ,संतोष विधाते यांचे डाळिंब पिकाचे नुकसान झाले. लीलाताई खिळदकर यांचे राहते घराचे संपूर्ण पत्रे उडून गेले. सिताराम विधाते यांचे घराची भिंत कोसळून त्यांच्या मुलाचे पायाचे हाड फ्रॅक्चर झाले तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.


नांदूर येथे चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी आष्टी तालुका कृषी अधिकारी गोरक्ष तरटे, कृषी पर्यवेक्षक लाळगे, कार्यालयीन अधीक्षक घनश्याम सोनवणे ,कृषी सहाय्यक खराडे मॅडम, मंडळ कृषी अधिकारी कांबळे आदींनी पिकांची पाहणी करून पंचनामे केले.





No comments:

Post a Comment