चिचोंडी पाटील प्रतिनिधी : सोहेल मनियार
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे रमजान ईदनिमित्त शांतता समितीची बैठक पार पडली.चिचोंडी पाटील येथील ग्रामस्थ जातीय सलोख्याने, बंधुभावाने राहतात.यामुळे गावातील सामाजिक वातावरण चांगले राहते.
लोकांमध्ये सहकार्याची, दुसऱ्या धर्माचा आदर करण्याची भावना आहे असे प्रतिपादन नगर तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले.
येणाऱ्या सण उत्सवाच्या काळात सर्व धर्मांच्या लोकांनी एकत्र येऊन उत्साहात, शांततेच्या वातावरणात, जातीय तेढ, वाद-विवाद निर्माण न करता,
जातीय सलोखा,सद्भावना व शांतता ठेवून,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आशा वातावरणात सण उत्सव साजरे करावेत असे आवाहनही स.पो.नि. राजेन्द्र सानप यांनी केले.
याप्रसंगी नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती तथा शिवसेना नेते इंजिनीयर प्रवीण कोकाटे यांनी चिचोंडी पाटील या गावात हिंदू-मुस्लीम एकतेने राहतात,रमजान ईद शांततेत व हिंदू मुस्लीम भाईचारा निर्माण होईल अशा वातावरणात साजरी होईल असे सांगितले,
शांतता कमिटीच्या बैठकीसाठी नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सरपंच बाजीराव हजारे,माजी सरपंच कासमशेठ सय्यद,पत्रकार सोहेल मनियार,
मुजाहिद मनियार,पोलिस पाटील संतोष खराडे, महेमूद शेख,जब्बार खान सर,खुद्दुस सय्यद,जहांगीर मनियार,इम्रान अत्तार, फारुख सय्यद,बाबूशेठ सय्यद,मदिना मस्जिद कमिटी,दायरा मस्जिद कमिटी,जमिया मस्जिद कमिटी चे सदस्य उपस्थित होते.
चिचोंडी पाटील गावात आजपर्यंत कुठलाही जातीय वाद, तणाव निर्माण झाला नाही व यापुढील काळातही होणार नाही याची दक्षता सर्व ग्रामस्थ घेत आहेत. प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येईल अशी ग्वाही गावकऱ्यांनी दिली.










No comments:
Post a Comment