Sunday, June 27, 2021

चिचोंडी पाटील येथे सुमारे 84 लक्ष रुपयाचा बंधारा मंजुर

 


चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

नगर तालुका शिवसेना युवा नेते व  मा.सभापती इंजि.श्री.प्रविणदादा कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नाने चिचोंडी पाटील येथे मेहेकरी नदीवर मारूतीचा माळ या ठिकाणी स्थानिक स्तर,जलसंधारण विभागामार्फत सुमारे 84 लक्ष रुपयांचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा मंजूर झाला आहे.


याकामी विद्यमान आमदार मा.पालकमंत्री बबनदादा पाचपुते,शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांतजी गाडे सर,उपजिल्हाप्रमुख संदेशजी कार्ले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सदर बंधाऱ्यामुळे जवळपास 250 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.यामुळे परिसरातील शेतकर्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

सदर बंधारा मंजूर होण्यासाठी मा.सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांनी मा.जलसंधारण मंत्री ना.विजयबापू शिवतारे तसेच विद्यमान जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांचेकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता.


या कामाबद्द्ल चिचोंडी पाटीलच्या ग्रामस्थांनी नामदार शंकरराव गडाख,मा.मंत्री विजयबापू शिवतारे,मा.पालकमंत्री तथा आमदार बबनदादा पाचपुते,शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांतजी गाडे सर,जि.प.सदस्य संदेशजी कार्ले व मा. सभापती इंजि.प्रविणदादा कोकाटे यांचे विशेष आभार मानले.



No comments:

Post a Comment