अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
देशात कोरोना संसर्गाचा शिरकाव झाल्यापासून सतत दीड वर्ष कोरोणा बाधितांच्या सेवेत झोकून दिलेल्या आमदार निलेश लंके यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन मध्ये समावेश झाल्याची माहिती संस्थेच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष फराह सुलतान अहमद यांनी दिली.आज गुरुवारी दिनांक 24 दुपारी एक वाजता मुंबई येथे होणाऱ्या कार्यक्रमात आमदार निलेश लंके यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन संस्थेच्यावतीने गौरविण्यात येणार असल्याचे फराह अहमद यांनी कळवले.
देशातील पहिले आमदार !
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये समाविष्ट झालेले निलेश लंके देशातील देशातील पहिले आमदार ठरले आहेत.
वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये समावेश झाल्याने आमदार निलेश लंके यांनी कोरोना संकट काळात केलेल्या सातत्यपूर्ण कामाला जागतिक परिमाण प्राप्त झाले आहे. कोरोना संसर्गाच्या काळात उल्लेखनीय काम केलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, अभिनेता सोनू सूद यांचा वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये यापूर्वीच समावेश झाला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दीड वर्षांपूर्वी देशात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी च्या सुरवातीला परप्रांतीय तसेच परजिल्ह्यातील कामगार,मजूर, तालुक्यात विलगीकरणमध्ये असलेल्या नागरिकांसाठी नगर पुणे रस्त्यावर आमदार निलेश लंके यांनी अन्नछत्र सुरू केले होते.
दोन महिने अहोरात्र सुरू असलेले अन्नछत्रा चा लाभ तब्बल साडेचार लाख लोकांना झाला. निर्बंध शिथिल झाल्यावर हजारो मजुरांना आपल्या गावी जाण्यासाठी आमदार लंके व त्यांच्या सहकार्यांनी मदत केली. कोरोणा बाधित यांवर उपचार करण्यासाठी आमदार लंके यांनी तालुक्यातील कर्जुलेहर्या येथे कोव्हिड उपचार केंद्र सुरू केले.या उपचार केंद्रात चार हजार ६६८ बाधितांनी कोरोणावर मात केली. संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आमदार लंके यांनी भाळवणी येथे एक हजार १०० खाटांचे शरदचंद्र पवार आरोग्य मंदिर सुरू केले आहे.मतदारसंघातील तसेच राज्याच्या विविध भागातील बाधिताबरोबरच परराज्यातील कोरोना बाधित भाळवणी येथील उपचार केंद्रात दाखल झाले.आज पर्यंत आठ हजारांहून अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.आमदार लंके कोरोना संसर्गाची काळात करीत असलेल्या कामाची देशात चर्चा झाली उत्तर प्रदेश सरकारने आमदार लंके यांचे कामाची दखल घेत उपचार केंद्रातील उपचारांची व्यवस्थापनाची माहिती घेतली आमदार लंके यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांचा समावेश वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये केला आहे.



No comments:
Post a Comment