Saturday, June 19, 2021

साईबाबा संस्थान चा अध्यक्ष काँग्रेसचाचं करुन आमदार डाॅ.सुधीर तांबेंची अध्यक्षपदी निवड करा ; राहाता काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव


राहाता काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत ठराव


राहाता : (प्रतिनिधी)

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले यावेळी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका सानाप, युवक जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, युवक कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, जिल्हाउपध्यक्ष एकनाथ गोंदकर, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत मापारी यांची प्रमुख उपस्थितीत तालुका कार्यकारिणीची बैठक तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या राहाता येथिल कार्यालयात संपन्न झाली.

सदर बैठकीत राहाता काँग्रेस च्या वतीने तालुक्यातील शिर्डी संस्थान चा अध्यक्ष काँग्रेसचाचं करुन त्याचे अध्यक्षपद आपल्या तालुक्याचे सुपुत्र नाशिक पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषद सदस्य आमदार डाॅ सुधीर तांबे यांना द्यावे असा एकमताने ठराव करण्यात आला.

याप्रसंगी ठरावाबाबत सखोल चर्चा करण्यात आली यावेळी डाॅ एकनाथ गोंदकर यांनी संस्थानसह परिसराचा विकास होण्याकरिता संस्थान चे

अध्यक्षपद डाॅ तांबेना मिळाले पाहीजे असे मत यावेळी व्यक्त केले.

यावेळी अखिल भारतीय काँग्रेस च्या सरचिटणीस प्रियंका सानाप यांनी आपण आजच्या कार्यकारीच्या बैठकीत घेतलेला संस्थान अध्यक्ष चा ठराव पक्षाध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसुलमंत्री ना बाळासाहेब थोरात यांना देणार असल्याची माहिती उपस्थितीतांना दिली.

यावेळी स्मितल वाबळे, सुभाष सांगळे, श्रीकांत मापारी, बाळासाहेब खर्डे, सचिन चौगुले, सुरेश आरणे, रावसाहेब बोठे, यांची भाषणे झाली.

या बैठकीस भास्कर फणसे, रमेश गागरे, उमेश शेजवळ पंकज लोंढे, राजेंद्र निर्मळ, सचिन गाडेकर, नितीन सदाफळ, आमृत गायके, सार्थक करमसे, सुभाष निर्मळ, युनुसभाई, मुन्ना फिटर, अरुण जाधव, आभिषेक वाघमारे, मदन मोकाटे, अमृत धुमाळ  यांच्यासह काँग्रेस चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. राजेंद्र निर्मळ यांनी आभार मानले.



No comments:

Post a Comment