अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
महापालिकेच्या नूतन महापौरपदी रोहिणी शेंडगे यांची व उपमहापौरपदी गणेश भोसले यांची निवड निश्चित झाली आहे .या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज दुपारी संपली. या मुदतीत महापौर पदासाठी शिवसेनेच्या रोहिणी शेंडगे यांनी सोमवारी अर्ज दाखल केला होता तर मंगळवारी राष्ट्रवादीकडून उपमहापौरपदासाठी गणेश भोसले यांनी अर्ज दाखल केला.दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने महापौरपदी रोहिणी शेंडगे तर उपमहापौरपदी गणेश भोसले यांचा बिनविरोध चा मार्ग मोकळा झाला आहे.
राष्ट्रवादीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे हे नगरला आले होते.त्यांनी आमदार जगताप यांच्यासह नगरसेवकांशी चर्चा केली यात भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नगर मध्ये प्रथमच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महापालिकेत सत्ता स्थापन करणार आहे. वरिष्ठ पातळीवरूनच हा निर्णय झाल्याने स्थानिकांना तो मान्य करावा लागला.या निवडीची अधिकृत प्रक्रिया 30 जून रोजी पार पडणार आहे.




No comments:
Post a Comment