पंचायत समिती नगर येथे शिवछत्रपतींचा राज्याभिषेक दिन शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा
पंचायत समिती नगर येथे शिवस्वराज्य दिन साजरा करताना सभापती सुरेखाताई संदीप गुंड ,उपसभापती डॉ.दिलीप पवार समवेत उपस्थित पदाधिकारी (छाया:सोहेल मनियार)
पंचायत समिती नगर येथे मंगलमय वातावरणात भगव्या स्वराज्यध्वजासह सभापती सुरेखाताई गुंड यांनी उभारली शिवशक राजदंड स्वराज्य गुढी
राज्यातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद कार्यालयामध्ये ६ जून रोजी सकाळी ९ वाजता स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारून त्यास अभिवादन करून शिव स्वराज्य दिन साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत त्याअनुशंगाने पंचायत समिती नगर येथे पंचायत समिती सभापती सुरेखाताई गुंड, उपसभापती डॉ. दिलीप पवार यांनी शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारली.
यावेळी पंचायत समिती माजी सभापती रामदास भोर, शिवसेना नेते संदिप गुंड, गट विकास अधिकारी सचिन घाडगे, सहा. गट विकास अधिकारी केदारे साहेब, तालुका आरोग्य अधिकारी माडगे मॅडम, गट शिक्षण अधिकारी सोनार साहेब, पशुसंवर्धन अधिकारी गुंजाळ मॅडम व सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment