पर्यावरण दिनानिमित्त बार्टी संस्था पुणे यांच्या समता दूत प्रकल्पाच्या वतीने चिचोंडी पाटील येथील स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करताना सौ.प्रेरणा विधाते,सरपंच मनोज कोकाटे आदी...(छाया:सोहेल मनियार)
चिचोंडी पाटील (वार्ताहर)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे यांच्या समतादूत प्रकल्पाच्या वतीने ५ जून “ जागतिक पर्यावरण दिना” निमित्त अहमदनगर जिल्हा व तालुका स्तरावर “वृक्षारोपण अभियान” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील स्मशानभूमी मध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची) स्वायत्त संस्था द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात माहे जून 2021 मध्ये ५ जुन या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त समतादूत प्रकल्पांतर्गत ५ जून ते २० जून या कालावधी मध्ये अहमदनगर जिल्ह्यात वृक्षारोपन अभियान पंधरवड्याचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यानिमित्त प्रती तालुका 50 वृक्ष लागवडीचे कार्य संस्थे मार्फत हाती घेतले आहे .
“लावूया रोपे,करुनी संवर्धन ...
मिळेल प्राणवायू, जपूया पर्यावरण”
सध्या सर्वत्र COVID-१९ चा वाढता प्रादुर्भाव व प्राणवायू (Oxygen) ची पडत असलेली कमतरता आणि वाढत असलेले प्रदुषण पाहता त्यासाठी फक्त एकच आवश्यक उपाय आहे तो म्हणजे वृक्षारोपण करणे याचाच विचार करून संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यात वृक्षारोपन करण्याचे निश्चित केलेले आहे. फक्त वृक्ष लागवड करणे हा एक प्रयास नसून समतादूत प्रकल्पाच्या मार्फत हे सर्व वृक्ष मोठे होतील तोपर्यंत त्यांचे संगोपन देखिल करण्यात येणार आहे म्हणजे हे वृक्ष चिरकाल सर्वांना प्राणवायू व सावली देतील.या करिता बार्टी संस्थेचे मा. महासंचालक यांनी आज औपचारिक रित्या पुणे येथून ऑनलाईन माध्यमातून कार्यक्रमाचे राज्यस्तरीय उद्घाटन केले व त्या नंतर स्थानिक गाव पातळीवर ग्रामपंचायत/ सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने लोकप्रतिनिधी यांच्या हातून दि. 6 जून रोजी १० रोपे चिचोडी पाटील या गावातील सम्शानभूमी येथे 10 झाडे लावण्यात आली.
संस्थेचे कार्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समानतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि या संबंधाने संशोधन आणि प्रशिक्षण व्हावे या उद्देशाने या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, सामाजिक न्याय व समता या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुल्यांवर काम करते. संस्थेत अनुसूचित जातीसाठी अनेक प्रकल्प राबविले जातात त्यात कौशल्य विकास, मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम, समतादूत, युवा नेतृत्व, संशोधन, ग्रंथालय स्पर्धा परीक्षाची संधी आणि व्यावसायिक प्रशिक्षण, जात वैधता प्रमाणपत्र आणि त्याचे स्कॅनिंग आणि डिजिटाइझशन असे विविध प्रकल्प आहेत.या प्रकल्पांच्या माध्यमातून बार्टी संस्था अनुसूचित जातीच्या युवकांमध्ये आत्मविश्वास, माहिती आणि ज्ञान वाढवणे याचे काम करते. बार्टी पुणे या संस्थेने अनुसूचित जातीच्या बेरोजगार युवती व युवकांना कौशल्य पुर्ण प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोगारक्षम बनवले आहे.
सामाजिक न्याय व समता या मुल्यांसाठी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांची स्वायंत्त संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) ही कटिबद्ध आहे.
कार्यक्रमाचे नियोजन नगर तालुका समतादूत सौ.प्रेरणा विधाते यांनी केले.प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद यांचे मार्गदर्शन लाभले.पुढील काही दिवस चिचोंडी पाटील गावातील तीस कुटुंब निवडून कुटुंबानुसार एक झाड असे झाडे लावण्यात येणार आहे अशी माहिती सौ.प्रेरणा विधाते यांनी दिली.
कार्यक्रमाप्रसंगी सरपंच मनोज कोकाटे,उपसरपंच कल्पना ठोंबरे, ग्रामपंचायत सदस्य दीपक हजारे, संदीप काळे,वैभव कोकाटे, अर्चनाताई चौधरी,जयश्रीताई कोकाटे,यशोदाताई कोकाटे, रिताताई कांबळे,सविताताई खराडे,मनिषाताई ठोंबरे,मंगल बेल्हेकर,ग्रामसेवक देवीदास मोरे आदी उपस्थित होते.
पत्रकार सोहेल मनियार 9284856967

No comments:
Post a Comment