लोकमन महाराष्ट्र न्युज
अहमदनगर : सोहेल मनियार
नगर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंडेगाव येथे शासकीय कामात अडथळा आणून शिक्षकास धक्काबुक्की केल्याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन येथे धक्काबुक्की करणाऱ्या व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी शिक्षक विजय सुदाम कडूस हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंडेगाव, तूकाई मळा तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथे कार्यरत आहेत. दिनांक २३.१२.२०२३ रोजी ११.३० वाजता केंद्रप्रमुख मंदा जगताप यांनी केंद्रातील सर्व शिक्षकांची बैठक / मीटिंग, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंडेगाव तालुका जिल्हा अहमदनगर येथे आयोजित केली होती. शिक्षकांची व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक १२ वाजेच्या सुमारास सुरू झाली. सदर बैठकीत शालेय पोषण आहार अधीक्षक प्रदीप शिंदे, केंद्रप्रमुख मंदा जगताप, संजय सहादू शेलार, ईश्वर मोहन नागवडे, सुहास भास्कर बोठे, भाऊसाहेब साहेबराव जाधव, संगीता शिवाजी भुजबळ, दीपस्वी अशोक पवार,शुभांगी मारुती मोरे, मनीषा धोंडीराम भालसिंग, ज्ञानदेव गंगाराम कुसळकर, अलका वसंत क्षीरसागर, मंदा तुकाराम शिंदे, गहिनीनाथ पांडुरंग पिंपळे,विलास मोहन कदम, प्रतिभा मोहन निक्रड, जयश्री एकनाथ दिवटे, पद्मावती बबन धुमाळ असे शिक्षक व अधिकारी हजर असताना साधारण १२:१५ वाजण्याचे सुमारास भाऊसाहेब शिंदे हा इसम तेथे आला व खुर्ची टाकून दारात बसला व शिक्षकांना म्हणाला, तुम्ही शाळेवर व्यवस्थित काम करत नाही, तुम्ही शाळेत उशिरा येतात, तुमचे शाळेत दिला जातो तो आहार त्याचा दर्जा खराब आहे. तेव्हा शिक्षक गहिनीनाथ पिंपळे यांनी प्रदीप शिंदे यांना विचारले की बाहेरचे माणसांना बैठकीत बसण्याचा अधिकार आहे का ? असे विचारले असता तुम्हाला लाज वाटते का, घर भाडे फुकट घेता. तेव्हा विजय कडूस यांनी त्यास का विनाकारण आमचे बैठक मध्ये व्यत्यय आणतो असे विचारले असता, जा तुम्हाला काय करायचं आहे,मी कलेक्टर साहेबांना ओळखतो,तुमची बदली करतो अशी धमकी दिली. धुमाळ मॅडम यांनी भाऊसाहेब शिंदे यास का आमच्या कामात व्यत्यय आणतो असे विचारले असता भाऊसाहेब शिंदे हा धुमाळ मॅडम यांच्यावर धावून गेला.आम्ही त्यास असे का करतो असे विचारले असता भाऊसाहेब शिंदे यांनी विजय कडूस यांची कॉलर धरून जीवे मारण्याची धमकी देऊन मीटिंग होऊ दिली नाही.
त्यानंतर शाळा सुटल्यानंतर शिक्षक विजय कडूस घरी येत असताना रस्त्यात अडवून विजय कडूस यांना वाईट वाईट शिवीगाळ करून म्हणाला की तुला काय करायचे ते करून घे असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊन निघून गेला. भाऊसाहेब शिंदे हा इसम गुंडेगाव येथील वस्तीवरील शाळेवर जाऊन आमचे इतर शिक्षकांना पण बरेच वेळेस शाळेवर जाऊन कर्तव्य करू देत नाही, विनाकारण शिवीगाळ करतो म्हणून भाऊसाहेब शिंदे यांनी आमचे शासकीय कर्तव्य करत असताना धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणला म्हणून विजय कडूस यांनी भाऊसाहेब शिंदे राहणार गुंडेगाव तालुका जिल्हा अहमदनगर यांच्या विरुद्ध कायदेशीर फिर्याद नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख हे करत आहेत.







No comments:
Post a Comment