नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे 40 लक्ष रू.निधीच्या विविध विकास कामांचा शुभारंभ करताना शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर, संपतराव म्हस्के,बाबासाहेब गुंजाळ, प्रविण कोकाटे आदी...(छाया: सोहेल मनियार)
लोकमन(प्रतिनिधी):-
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे पंचायत समितीचे मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या सुमारे 40 लक्ष रु.कामांचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे सर यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के हे होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्केट कमिटीचे मा.सभापती बाबासाहेब गुंजाळ व जेष्ठ शिक्षक नेते आबासाहेब कोकाटे सर हे उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी बोलताना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे सर यांनी मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांच्या कामाचे कौतुक करताना पंचायत समितीच्या माध्यमातून आपल्या पदाला पूर्ण क्षमतेने न्याय देण्याचे काम केल्याचे आवर्जून सांगितले.
चिचोंडी पाटील गणामध्ये शासकीय योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी झाल्याचे संपतराव म्हस्के यांनी संगितले.यावेळी मा.सभापती बाबासाहेब गुंजाळ, शिक्षकनेते आबासाहेब कोकाटे सर, कामधेनु पतसंस्थेचे चेअरमन डॉ.ययाती फिसके व इतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केले.
मा.सभापती इंजि.प्रविण कोकाटे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या चिचोंडी पाटील येथील पांढरी वस्ती व गावठाण येथील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,एल.ई.डी दिवे बसविणे,बंदिस्त गटार करणे,पाण्याची पाईपलाईन करणे,स्मशानभूमी परिसरात पाण्याची टाकी करणे अशा एकत्रित जवळपास 40 लक्ष रुपये किमतीच्या कामांचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी मा.उपसभापती दत्तात्रय हजारे,मा.सरपंच पांडुरंग कोकाटे,मा.चेअरमन महादेव खडके,मा.उपसरपंच शरद पवार,डॉ.मारुती ससे,व्हा.चेअरमन काशिनाथ बेल्हेकर, पंडितराव कोकाटे,लोकमान्य पतसंस्था चेअरमन अरुण दवने,शिवसेना नेते अजय कांकरीया,साहेबराव पाचारणे पाटील,रामदास कोकाटे,ग्रामविकास अधिकारी देविदास मोरे,ग्रामपंचायत सदस्या सौ.रिता प्रकाश कांबळे,सौ.यशोदा विश्वसागर कोकाटे,ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर ठोंबरे,दत्तू धुळे,महादजी कोकाटे,संदीप काळे,दिपक हजारे,बाळासाहेब बेल्हेकर,पै.राजू कोकाटे,नानाभाऊ कोंडीबा कोकाटे,रघुनाथ दळवी साहेब,मेजर भगवान थोरात,विजय कोकाटे,राजेंद्र कोकाटे,संजय कोकाटे,सुरेश तनपुरे,चंद्रकांत पवने,बबन कोकाटे,रघुनाथ कोकाटे,रमेश कुलथे,भाऊ गायवळ,अमर शेख,कृष्णा पाचारणे,लहानू तनपुरे,राजू तनपुरे,अंबादास कोकाटे,संतोष कोकाटे,संतोष विघे,नंदू गायकवाड,युवासेनेचे प्रशांत कांबळे,शेलेश देवकर,शशिकांत आगलावे,भाऊ सरोदे,रोहित काळे,बाबासाहेब सरोदे,शरद बळे,दिपक कांबळे,सुनिल कोकाटे,रमेश पवार आदींसह ग्रामस्थ व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन ठोंबरे यांनी केले तर आभार मा.उपसरपंच डॉ.मारुती ससे यांनी मानले.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment