लोकमन महाराष्ट्र न्यूज (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
दिनांक 16 फेब्रुवारी 2021 रोजी अविनाश बाबासाहेब साठे राहणार - भोयरे पठार ता नगर हे त्यांच्या कुटुंबीयांसह समारंभास गेले असताना घरास कुलूप लावून गेले होते ,चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून 30 ग्रॅम वजनाचे सोन्याचे घंटन चोरून नेले होते, सदर बाबत नगर तालुका पोलिस ठाणे गु र न 75/2021भा द वी कलम 454,380 प्रमाणे गुन्हा दाखल होता.सदर गुन्ह्यातील आरोपींना अटक करून त्यांचे कडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला होता.सदर ची कारवाई मा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे ,उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स पो नि राजेंद्र सानप , PC संभाजी बोराडे, PC जयदत्त बांगर यांनी केलेली आहे.



No comments:
Post a Comment