Saturday, September 17, 2022

दिव्यांग मुलांच्या कला गुणांना वाव देण्याची विशेष गरज - गटशिक्षणाधिकारी बाबूराव जाधव

अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या केंद्रस्तरीय चित्रकला स्पर्धेमध्ये  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव कौडा येथील ६ व्या इयत्तेत शिकणारी दिव्यांग विद्यार्थिनी श्रद्धा संतोष दळवी  हिने सर्वसामान्य विद्यार्थ्यांमध्ये समावेशित सहभाग घेऊन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

याबद्दल तिचे विशेष कौतुक करताना नगर तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव यांनी  दिव्यांग मुलांना इतर सर्व सामान्य मुलांप्रमाणे विविध स्पर्धांमध्ये सहभागी करून  घेऊन  त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याची विशेष गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले .


 कु . श्रद्धा हिला  गौरवचिन्ह देऊन प्रोत्साहन मिळावे यासाठी चित्रकलेचा संपूर्ण संच भेट देण्यात आला . 


तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव कौडा  येथील मुख्याध्यापक व वर्गशिक्षक यांचेसह विशेष शिक्षक लता बोरुडे यांचेही विशेष कौतुक करण्यात आले


याप्रसंगी विस्तारअधिकारी रवींद्र कापरे ,रामनाथ कराड ,चंद्रकांत सोनार ,निर्मला साठे , चास केंद्राचे आदर्श केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी ,वर्गशिक्षक   राजेंद्र खडके , विशेषतज्ञ सुधीर लांडगे ,अखिल महाराष्ट्र प्राथ शिक्षक संघाचे राज्यसंघटक राजेंद्र निमसे यांचेसह सर्व विषयतज्ञ व विशेष शिक्षक उपस्थित होते .


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष शिक्षक लता बोरुडे यांनी केले तर आभार  विशेषतज्ञ  सुधीर लांडगे यांनी मानले.



No comments:

Post a Comment