Tuesday, January 25, 2022

काय सांगता! 20 हजारांच्या आत iPhone; 26 जानेवारीनंतर मिळणार नाही अशी अविश्वसनीय ऑफर


iPhone SE Offers: iPhone SE हा ॲपलचा चा एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे जो फ्लिपकार्टवर खूपच स्वस्तात उपलब्ध आहे.

लोकमन(प्रतिनिधी):- 


Apple iPhone घेण्याचा विचार असेल आणि जास्त बजेट नसेल तर Apple iPhone SE पर्याय समोर येतो. हा कंपनीचा सर्वात स्वस्त आयफोन आहे.


आनंदाची बातमी म्हणजे आता फ्लिपकार्ट ग्रँड गॅजेट डेज सेलमध्ये हा फोन आणखीन स्वस्त झाला आहे. Apple iPhone SE चा 64GB मेमोरी व्हेरिएंट 26 जानेवारी पर्यंत 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल.


iPhone SE वरील ऑफर आणि किंमत:- 

iPhone SE चा 64GB मेमोरी व्हेरिएंट 24 % डिस्काउंटसह 29,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 


परंतु तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून 15,850 रुपयांपर्यंतची बचत करू शकता. तसेच फ्लिपकार्ट  ॲक्सिस बँक क्रेडिट कार्डवर 5% अनलिमिटेड कॅशबॅक मिळत आहे. त्यामुळे हा स्वस्त आयफोन 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत विकत घेण्याची संधी मिळते.


iPhone SE 2020 चे स्पेसीफिकेशन्स:- 

iPhone SE 2020 मध्ये 4.7-इंचाचा रेटिना एचडी आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 625 नीट्स ब्राईटनेस, HDR10, डॉल्बी व्हिजन आणि ट्रू टोनला सपोर्ट करतो. 


या फोनमध्ये Touch ID साठी बटन देण्यात आले आहे. फोनच्या बॅक पॅनलवर 12MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह सादर करण्यात आला आहे. या एंट्री लेव्हल आयफोनमध्ये वायरलेस चार्जिंग आणि IP67 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्स देण्यात आले आहे.



लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

No comments:

Post a Comment