Friday, January 21, 2022

24 जानेवारीला शाळा सुरू करण्याचा निर्णय, आरोग्यमंत्री टोपेंची माहिती


मुंबई(प्रतिनिधी):-


महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. मात्र मागील काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. रुग्णसंख्या घटल्यामुळे राज्य सरकारने बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते बारावी असे सर्व वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. येत्या सोमवारपासून शाळा सुरु होतील. तर दुसरीकडे राज्यात मुंबई वगळता राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. राज्यात काल दिवसभरात 46197 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 37 जणांचा मृत्यू झालाय. दिवसभरात 52025 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.


राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय - टोपे

राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलांवर परिणाम होताना पाहायला मिळत आहे, त्यामुळे 24 जानेवारीला शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शाळेत लसीकरण करता येईल का, याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. 50 टक्के लसीकरण झालं आहे. 30 लाख मुलांना लस दिली आहे, असंही त्यांनी सांगितलंय.


शाळा सुरू करा आणि त्याचे नियम नीट करा - चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील वाढत्या कोरोना संदर्भात बोलावलेल्या बैठकीत उपस्थित राहण्याचा मानस व्यक्त केला आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहणं शक्य होत नसेल तर चंद्रकांत पाटील अजित पवारांना पत्र लिहणार आहेत. तर शाळा सुरू करा आणि त्याचे नियम नीट करा. आता शाळा आणि क्लासेस यावर गदा आणून चालणार नाही, असं पाटील म्हणाले आहेत.


लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

No comments:

Post a Comment