चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) :
नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील रहिवासी ग.भा.शशिकला बलभीमराव जगताप पाटील वय ७८ वर्ष, यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्या धार्मिक, अध्यात्मिक व मायाळू स्वभावाच्या होत्या.
त्यांच्या पश्चात दोन मुले राधाकिसन जगताप व दीपक जगताप आणि दोन मुली मोहिनी दिलीप पठाडे (मिडसांगवी) व निर्मला सतीश शेटे (सोनई) तसेच जावई,सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.अहमदनगर येथे सेवेत असलेले राधाकिसन बलभीमराव जगताप पाटील व राहुरी तालुक्यात शिक्षक असलेले दीपक बलभीमराव जगताप पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या. कै.ग.भा.शशिकलाबाई बलभीमराव जगताप पाटील यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
सोहेल मनियार वार्ताहर चिचोंडी पाटील 9284856967
No comments:
Post a Comment