मुंबई(प्रतिनिधी):-
भारताची गानकोकिळा लता मंगेशकर आपल्या लाडक्या दीदी यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. लता दीदी यांची प्रकृती चिंताजनक झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. लता दीदींना कोरोना आणि न्यूमोनियामुळे दक्षिण मुंबईतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ९ जानेवारीपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, दीदी लवकर बऱ्या व्हाव्यात आणि घरी परत याव्या यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन मंगशेकर कुटुंबियांनी केल्याचे प्रवक्त्या अनुषा अय्यर यांनी सांगितले आहे.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment