मुंबई(प्रतिनिधी):
नऊ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप देण्याचा निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयानं दिला. फाशी रद्द करण्याची गावित बहिणींची मागणी उच्च न्यायालयानं स्वीकारली आहे.
महाराष्ट्रात नव्वदच्या दशकात गाजलेल्या हत्याकांडातील आरोपी सीमा गावित आणि रेणुका शिंदे या कोल्हापूरमधील दोन बहिणींनी आपली आई अंजनाबाई गावितच्या मदतीनं विविध भागातून 13 बालकांचं अपहरण करून त्यांच्यापैकी 9 मुलांची हत्या केली होती.
2001 साली त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र 20 वर्षांनंतरही या शिक्षेची अद्याप अमंलबजावणी न झाल्यानं जगण्याची उमेद वाढल्याचा दावा करत गावित बहिणींनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment