नवे भांडे,गाईला पास, अन्न, तिळ पात्र, गुळ, तिळ, सोने, भुमी, गाय, वस्त्र, चोडा इत्यादी यथाशक्ती दाने करावीत.संकलम देशकाल कथन करून मम आत्मनः सकलपुराणोक्त फलप्राप्य श्री सवितृ प्रामिद्वारा सकलपापक्षयपूर्वक स्थिर सौभाग्य कुलाभिवृद्धि धनधान्यसमृद्धि दीर्घायु महेश्वर्य मंगलाभ्युदय सुखसंपादादी कल्पोक्सफल सिद्धये अस्मिन् मकरसंक्रमण पुण्यकाले ब्राह्मणाय (अमुक) दानं करिष्ये असा संकल्प करून दान वस्तुचे व ब्राह्मनाचे पुजन करून दान द्यावे. दक्षिणा द्यावी.
दि. १४ जानेवारी २०२२ शुक्रवारी दुपारी १४.२९ पासुन सुर्यास्तापर्यंत आहे या दिवसाचे कर्तव्य तिलमिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उळणे अंगास लावणे, तिलहोम, तिलसर्पण, तिलभक्षण व तिलदान असा सहा प्रकारे विळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो. शके १९४३ पौष शु. १२ रोजी दुपारी १४.२९ वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. बालव करणावर संक्रांत होत असल्याने उक्त असलेले वाहनादि प्रकार वाप्रमाणे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. पिवळे वस्त्र परिधान केले आहे. हातात गधा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फुल घेतलेले आहे. पावस भक्षण करीत आहे. सर्प जाति आहे. भूषणार्थ मोती धारण केलेले आहे. वारंनाव मिश्रा य नाक्षत्रनांव नंदा असून सामुदाय मुहूर्त ४५ आहेत. उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्य दिशेस पाहत आहे.
संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष-गवत तोडणे गाई-म्हशींची धार काढणे व कामविषय सेवन ही कामे करू नयेत,दर वर्षी मकर संक्रांति संदर्भात ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरविण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो, त्यामुळे त्या अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये.
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment