पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे आज सायंकाळी ५ वाजता रेल्वे रुळावरुन एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. गुवाहाटीहून जाणाऱ्या बिकानेर एक्स्प्रेसचे उत्तर बंगालमधील कूचबिहार आणि जलपाईगुडी दरम्यान डोमोहनीजवळ मायागोरी ४-५ डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकूण १२ डब्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अपघातातील मृतांची नेमकी संख्या अद्याप समजू शकलेली नाही. पण अपघाताची तीव्रता पाहता अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. उलटलेल्या डब्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी अडकले असून अनेक जखमी झाले आहेत.
ट्रेन क्रमांक १५६३३ बिकानेर एक्सप्रेस मंगळवारी रात्री राजस्थानमधील बिकानेर येथून निघाली होती. गुरुवारी सकाळी ५.४४ वाजता ही ट्रेन पाटणा रेल्वे स्थानकातून निघून दुपारी २ वाजता किशनगंजला पोहोचली आणि तेथून गुवाहाटीकडे रवाना झाली. भारतीय रेल्वेने ८१३४०५४९९९ हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. अजूनही अनेक लोक ट्रेनमध्ये अडकले असून, त्यांचे बचावकार्य सुरू आहे.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment