नगर पंचायत निवडणुका झाल्या आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची चाहूल लागली असून आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद गटातून कोण-कोण उभा रहणार या चर्चेला आता उधाण आले आहे.
लोकमन(प्रतिनिधी):-
बीड जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच वेगळी चर्चा करणारा तालुका म्हणजे आष्टी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुका,आष्टी तालुक्यात कोणत्या गटातून कोण निवडणूक लढवणार याबाबत आता चर्चेला उधाण आले आहे.
मुर्शदपुर जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीकडून सतीश शिंदे यांचे नाव चर्चेल जात आहे तर भाजपाकडून आ. सुरेश धस, माजी आ. भीमराव धोंडे यांच्या विचारातून नेमकं कोणतं नाव समोर येणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. तर काँग्रेस पक्षाकडून अहमद पठाण इच्छुक आहेत तर आष्टी हरिनारायण जिल्हा परिषद गटातुन भाजपाकडून देविदास धस,अमर निंबाळकर,बद्रीनाथ जगताप,बबन झांबरे यांची नावे चर्चेत आहेत,तर राष्ट्रवादीकडून सुधीर जगताप,काकासाहेब शिंदे यांचे नावे चर्चेत जात आहेत.
कड़ा जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादीकडून महेश आजबे राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब घुले तर काँग्रेसकडून रवींद्र ढोबळे यांचे नाव चर्चेत आहे. तर भाजपाकडून संजय आजबे,संदीप खकाळ,अनिल ढोबळे,युवराज पाटील यांचे नाव चर्चित आहेत.
दादेगाव जिल्हा परिषद गटात भाजपाकडून अजय भीमराव धोंडे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर राष्ट्रवादीकडून परमेश्वर शेळके, अंकुश चव्हाण निवडणूक लढविण्याची शक्यता आहे तर काँग्रेसकडून विनोद निंबाळकर, निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. लोणी जिल्हा परिषद गटात भाजपाकडून साहेबराव दादा थोरवे यांचे नातू आणि माजी जिल्हा परिषद सदस्य राजाभाऊ दरेकर यांचे जावई धैर्यशील थोरवे यांचे नाव चर्चेत जात आहे. तर काँग्रेसकडून मीनाक्षी पांडुळे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या काही दिवसापासून दौरा करत असलेले टाकळी अमियाचे सरपंच सावता ससाने यांचं नाव चर्चेत आहे राष्ट्रवादीकडून तालुकाध्यक्ष अण्णासाहेब चौधरी निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर दौलावडगाव जिल्हा परिषद गटात भाजपाकडून साहेबराव म्हस्के,अमोल, जयदत्त धस तर राष्ट्रवादीकडून युवक नेते महादेव डोके यांचं नाव आघाडीवर आहे.
धामणगाव जिल्हा परिषद गटात भाजपाकडून विजय गोल्हार एन.टी गर्जे अशोक गर्जे तर राष्ट्रवादीकडून शिवाजी नाकाडे यांचे नाव आघाडीवर आहे ,तर नवीन होणाऱ्या आठवा जिल्हा परिषद गट हा शिराळ अन्यथा बीड सांगवी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याबद्दल आत्ताच बोलणे उचित ठरणार नाही .एकंदरीत या निवडणुकीमध्ये विधान परिषदेचे आमदार सुरेश धस भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे हे एकत्र राहून निवडणूक कशी लढवणार तिकिटाची वाटप कशी होणार अशी चर्चा सुरू आहे तर राष्ट्रवादीचे नेते आमदार बाळासाहेब आजबे हे आपली कशी फिल्डिंग लावणार याबाबत सध्या आष्टी तालुक्यातील मतदारात कुजबुज सुरू आहे.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment