अहमदनगर (प्रतिनिधी):-
नगर शहराच्या विकासाची पायाभरणी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्व युवकांना करायचे आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मुर्तीचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र मध्ये ऐतिहासिक ठरला आहे. नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रभरतील शिवप्रेमी मोठ्या संख्येने दाखल होऊन मोठ्या उत्साहात आज शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती मूर्तीचा लोकार्पण सोहळा पारंपारिक पद्धतीने संपन्न झाला.
तसेच शहरांमध्ये धर्मवीर संभाजीराजेचां पुतळा बसविण्यासाठी पाठपुरावा करणार याच बरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
असे प्रतिपादन आ. संग्राम जगताप यांनी व्यक्त केले. अहमदनगर शहरात रविवारी (दि.६ फेब्रुवारी २०२२) छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पूर्णाकृती मूर्तीचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आ.जगताप बोलत होते.
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीचा लोकार्पण सोहळा आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी यावेळी उपमहापौर गणेश भोसले, युवानेते अक्षय कर्डीले, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment