अहमदनगर(प्रतिनिधी):-
नगर तालुका पोलीस ठाणे येथे वाळकी येथील शेतकरी नामे संदीप मधुकर तावरे यांनी पश्चीम बंगाल मधील व्यापा यांना संत्रा विक्री केली असुन त्याचे 14 लाख 50 हजार रुपये न देता फसवणुक केल्याबाबतची तक्रार नगर तालुका पोलीस ठाणेस दिलेली होती. सदर बाबत नगर तालुका पोलीस ठाणे गु.र.नं 114/2022 भा.द.वि कलम 420,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्यातील आरोपी नामे 1 ) अमोल ज्ञानेश्वर फुटाणे रा. वरुड जि. अमरावती 2) मायनुल इस्लाम करीम इस्लाम रा.नॉर्थ परगाना पश्चीम बंगाल यांनी वाळकी येथील शेतक याचे 14,50000 रुपये किंमतीचे संत्रा बागेतुन खरेदी केले होते.
सदर संत्राच्या गाड्या भरल्यानंतर त्यांनी शेतक-याच्या बँक खात्यावर 14 लाख 50 हजार रुपयाचे RTGS द्वारे पैसे पाठविल्याबाबत बँकेचे संदेश प्राप्त झाले. त्यानंतर संत्रा गाड्या महाराष्ट्र राज्याबाहेर गेल्यानंतर सदर व्यापा यांनी शेतक याचे बँक अकाऊंट होल्ड केले.
सदर शेतक-याचे अकाऊंट होल्ड केल्यामुळे शेतक-यास त्याचे पैसे बँकेमधुन काढता आले नाहीत. त्यामुळे शेतकरी नामे संदीप मधुकर तावरे यांची फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी नगर तालुका पोलीस ठाणेस येवून तक्रार दिली.
त्यानंतर सदर दोन्ही आरोपींना नगर तालुका पोलीसांनी तात्काळ अटक केली व मा.न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना मा.न्यायालयाने 07 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर आरोपीतांकडुन शेतक-याचे 14 लाख 50 रुपये नगर तालुका पोलीसांकडुन परत मिळवून देण्यात आलेले आहेत.
तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की,व्यापायांवर लगेचच विश्वास न ठेवता सतर्कतेने व बारकाईने व्यवहार करावेत. सदरची कामगीरी मा.पोलीस अधिक्षक मनोज पाटील सो.अहमदनगर मा.अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल,सो. मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहा.पो. निरीक्षक राजेंद्र सानप सो.पो. उपनिरीक्षक युवराज चव्हाण, मपोना / गायत्री धनवडे, पोकाँ / विक्रांत भालसिंग,पोकाँ / विशाल टकले यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment