गोसावीवाडी ता.श्रीगोंदा येथे कोव्हीड लसीकरणाचे उद्घाटन करताना सरपंच दत्ता घाडगे,ग्रा.पं.सदस्य विठ्ठल कुसेकर मेजर,मा.ग्रा.पं.सदस्य नंदूकाका दरेकर,शिक्षकवर्ग,आरोग्य कर्मचारी,आदी..( सोहेल मनियार,अहमदनगर )
अहमदनगर (प्रतिनिधी)
श्रीगोंदा तालुक्यातील महांडूळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत,गोसावी वाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये, कोव्हीड १९ लसीकरण मोहिमेअंतर्गत ४५ वर्ष वयोगटाच्या वरील नागरिकांचे लसीकरण ग्रामपंचायत महांडूळ वाडीचे,प्रथम लोकनियुक्त सरपंच दत्ता घाडगे यांच्या नियोजनातून करण्यात आले.कोरोना लसीकरण कॅम्प व कोरोना रॅपिड अँटीजेन चाचणीचे उद्घाटन प्रथम लोकनियुक्त सरपंच दत्ताजी घाडगे यांच्या हस्ते व प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण चे वैद्यकीय अधिकारी प्रकाश कांबळे,डॉक्टर सुरोसे, डॉक्टर बडे, आरोग्य पर्यवेक्षक झांबरे, आरोग्य कर्मचारी नेटके बी.बी. ग्रा.पं.सदस्य विठ्ठल कुसेकर मेजर,मा.ग्रा.पं.सदस्य नंदूकाका दरेकर,प्रतिक लष्करे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.१३० नागरिकांचे लसीकरण या वेळी करण्यात आले.
याप्रसंगी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मांडवगणचे शाखाधिकारी अतुल करवाडे, ग्रामसेवक देवतरसे भाऊसाहेब,विठ्ठलराव महांडुळे,प्रतिक लष्करे, ठोंबरे, भस्मेआदींची उपस्थिती होती.
ग्रामपंचायत मांडूळवाडी गोसावीवाडी या ठिकाणी कोरोनाविषाणू चा उद्रेक वाढू लागल्याने लसीकरण कॅम्प घेण्यात आला. सरपंच दत्ता घाडगे हे नेहमीच समाजाला आधार देण्याचे काम करत असतात आजच्या या सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थ, कोरोना रुग्ण, नातेवाईक आणि दत्ता घाडगे मित्र मंडळ यांनी सरपंच दत्ता घाडगे यांचे विशेष कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.कोरोना संकटकाळात आपणही काहीतरी समाजाच्या कामी यावे म्हणून आज विविध उपक्रम महांडूळवाडी ग्रामपंचायत राबवत आहे.महांडूळवाडी ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, सरपंच,उपसरपंच यांनी राबवलेल्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. कोव्हिड लसीकरणाचा कॅम्प यशस्वी होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण चे आरोग्य कर्मचारी,सिस्टर हराळ एस.आर., सिस्टर इंगळे एल.बी., परिचारिका वाडगे डी. बी., आरोग्य कर्मचारी नेटके बी.बी.,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेख समीर, मनियार सर, रायकर सर,पवार सर,अंगणवाडी सेविका यादव एस. बी.,चव्हाण एम.आर., शितल भस्मे,आशा सेविका घालमे सी.बी., महांडूळवाडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक,कर्मचारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक आदींनी विशेष परिश्रम घेतले.
महांडूळवाडी ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच दत्ता घाडगे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.
( पत्रकार सोहेल मनियार 9284856967 )


No comments:
Post a Comment