राज्यातील साखर उत्पादनातही पहिल्या दहा मध्ये जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश
लोकमन महाराष्ट्र न्यूज
राज्यात उच्चतम ऊस गाळप करणाऱ्या दहा साखर कारखान्यांमध्ये नगर जिल्ह्यातील चार कारखाने अव्वल ठरले असून, उच्चतम साखर उत्पादन करण्यातही जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी बाजी मारली आहे. तर दुसरीकडे कमी साखर उतारा असलेल्या राज्यातील दहा साखर कारखान्यांमध्ये जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश आहे. शिवाय उच्चतम ऊसदर दिलेल्या दहा कारखान्यांमध्ये जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याचा समावेश नाही.
पुणे येथील साखर आयुक्तालयाने गाळप हंगाम 2020- 21 मधील राज्यातील 21 जिल्ह्यांमधील साखर कारखान्यांचा तपशील जाहीर केला आहे. जिल्हानिहाय ऊसगाळप तपशिलानुसार या हंगामात अहमदनगर जिल्ह्यातील 22 सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी एकूण १ कोटी ५५ लाख १५ हजार ७५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले.त्यातून जिल्ह्यात एकूण १ कोटी ५२ लाख १२ हजार ३०३ मेट्रिक टन साखरेची निर्मिती झाली आहे. सरासरी १६६ दिवस गाळप चालले असून,सरासरी साखर उतारा ९.८० टक्के इतका आहे.
उच्चतम ऊस गाळप केलेल्या राज्यातील १० कारखान्यांमध्ये नगर जिल्ह्यातील चार कारखान्यांचा समावेश आहे.यात कर्जत तालुक्यातील अंबिका नगर येथील इंडिकाँन डेव्हलपर्स प्रा.लि. श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कारखान्याने १८.८८ मेट्रिक टन,भेंडा बु. ता. नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने १४.५० मेट्रिक टन,सोनई ता.नेवासा येथील मुळा सहकारी साखर कारखान्याने १२.५८ मेट्रीक टन,बाभूळगाव ता. शेवगाव येथील गंगामाई इंडस्ट्रीज अँड कंस्ट्रक्शन लि. या खाजगी कारखान्याने १२.५५ मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे.
उच्चतम साखर उत्पादन केलेल्या राज्यातील दहा जिल्ह्यात नगर जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश आहे. त्यामध्ये कर्जत तालुक्यातील अंबिका नगर येथील इंडिकाँन डेव्हलपर्स प्रा. लि. श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कारखान्याने १७ लाख १ हजार ५०० क्विंटल, तर भेंडा बु. तालुका नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने १५ लाख ६० हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.तर दुसरीकडे कमी साखर उतारा असलेल्या राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये नगर जिल्ह्यातील वाळकी ता.नगर येथील पियुष शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड हा खाजगी (साखर उतारा ७.५५ टक्के) तर प्रवरानगर ता.राहता पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना (साखर उतारा सात पॉईंट ७.७९ टक्के ) या दोन कारखान्यांचा समावेश आहे.
उच्चतम उताऱ्यात एकही कारखाना नाही
राज्यात उच्चतम उतारा असलेल्या दहा कारखान्यांमध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील कारखान्यांचा समावेश आहे .यामध्ये नगर जिल्ह्यातील एकही कारखाना नाही. सर्वात कमी ऊस गाळप साखर उत्पादन यामध्येही जिल्ह्यातील एकही कारखाना नाही . मात्र उच्चतम ऊसदर दिलेल्या कारखान्यात जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंबिकानगर येथील इंडीकाँन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड श्री.अंबिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचा समावेश आहे.
सोहेल मनियार पत्रकार 9284856967

No comments:
Post a Comment