Thursday, May 13, 2021

आम्ही शिक्षक नगरकर ग्रुपच्या वतीने शाळेला ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन भेट



आम्ही शिक्षक नगरकर ग्रुपच्या वतीने जि.प.प्राथ.शाळा चिचोंडी पाटील येथे ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन भेट देताना गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार,माजी सभापती प्रवीण कोकाटे आदी.. (छाया : सोहेल मनियार)



नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आम्ही शिक्षक 
नगरकर ग्रुपच्या वतीने ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन व ५ ड्रम सॅनिटायझर 
पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार,माजी सभापती प्रवीण कोकाटे
 यांच्या हस्ते देण्यात आले.
जि.प.प्राथ.शाळा चिचोंडी पाटील येथे कोव्हिड रुग्णांसाठी विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. 
त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी याठिकाणी ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन
 व ५ ड्रम सॅनिटायझर दिले असून आता सेन्सॉर मुळे हाताचा स्पर्श न करता सॅनिटायझर मिळेल
 तसेच आम्ही शिक्षक नगरकर ग्रुपच्या वतीने आत्तापर्यंत नगर तालुक्यात २ लक्ष रुपयांची मदत
 केली आहे.त्यामध्ये औषधे , ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन, मास्क,सॅनिटायझर आदी
 स्वरूपात मदत केली आहे. अशी माहिती पंचायत समिती नगरचे गटशिक्षाधिकारी
 चंद्रकांत सोनार यांनी दिली.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे,जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी
 अल्पसंख्यांक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा मनियार, मुख्याध्यापक कांबळे,
सरपंच मनोज कोकाटे,ग्रामसेवक देविदास मोरे,ग्रामपंचायत सदस्य दिपक हजारे
,पोलिस पाटील नीळकंठ खराडे, अनिल डोखडे, प्रशांत कांबळे, शिवाजी कोकाटे आदी उपस्थित होते.






 सोहेल मनियार पत्रकार 9284856967
Attachments area

No comments:

Post a Comment