Saturday, May 15, 2021

शंभूराजे जयंती चिचोंडी पाटील येथे उत्साहात साजरी ; शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने कोव्हीड रुग्णांना बिस्कीट वाटप



ग्रामपंचायत कार्यालय चिचोंडी पाटील येथील शंभूराजे जयंती साजरी करताना शंभुराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता वाडेकर, शिवाजी सुंबे आदी... (छाया : सोहेल मनियार)

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे ग्रामपंचायत कार्यालयात शंभुराजे प्रतिष्ठान चे अध्यक्ष दत्ता भाऊ वाडेकर, शिवाजी सुंबे यांच्या हस्ते शंभूराजे जयंती साजरी करण्यात आली. एकाच दिवशी शंभूराजे जयंती, रमजान ईद,अक्षय तृतीया,
बसवेश्वर महाराज जयंती एकाच दिवशी आल्याने ग्रामस्थांनी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करून सामाजिक अंतर राखून मास्क व सॅनिटायझरचा वापर करून जयंती साजरी करण्यात आली.शंभूराजे यांचे चरित्र व महती सांगितली.सर्वांनी अक्षय तृतीया,शंभुराजे जयंती,रमजान ईद,बसवेश्वर महाराज जयंती च्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे,सरपंच मनोज कोकाटे,माजी उपसरपंच शरद पवार,शंभुराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता भाऊ वाडेकर, शिवाजी सुंबे सर,सचिन ठोंबरे, विद्यासागर कोकाटे,प्रशांत कांबळे,अनिकेत जगताप, सुखदेव कोकाटे आदी उपस्थित होते.




No comments:

Post a Comment