Saturday, May 22, 2021

बॉस्को ग्रामीण विकास केंद्र अंतर्गत पारेवाडी येथे स्टीमरचे वाटप



बॉस्को ग्रामीण विकास केंद्र अंतर्गत पारेवाडी व पारगाव येथे स्टीमरचे वाटप करताना फा.जॉर्ज डिआबिओ,सभापती संदीप गुंड, गटविकास अधिकारी सचिन घाडगे आदी ... (छाया:सोहेल मनियार)

बॉस्को ग्रामीण विकास केंद्र अंतर्गत जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नगर तालुक्यातील पारेवाडी येथे वाफ घेण्यासाठी मशीन (स्टीमर) चे वाटप करण्यात आले.

दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोणाचा शिरकाव वाढत चालला आहे.गावोगावी कोरोना चे रुग्ण वाढत आहेत.यामुळे पारेवाडी  व पारगाव येथे वाफ घेण्याच्या मशीन (स्टीमर) चे वाटप करत आहोत अशी माहिती बास्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फा.जॉर्ज डिआबिओ, उपसंचालक फा.नेल्सन मुडलियार यांनी दिली.पारगाव येथे सभापती संदीप गुंड यांच्या सहकार्यातून स्टीमर चे वाटप केले.पारगाव ग्रामस्थांकडून या उपक्रमाचेकौतुक होत आहे. तसेच आत्तापर्यंत रांजणी, माथनी,आगडगाव, बाळेवाडी आदी ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला एक स्टीमर देण्याचा उपक्रम केला आहे. आत्तापर्यंत दीड हजार स्टीमर चे वाटप केले आहे.अजून ४ हजार स्टीमर बास्को ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून वाटणार आहोत.यासाठी सभापती संदीप गुंड यांचे मोलाचे योगदान,सहकार्य मिळत आहे.असे फा.जॉर्ज डिआबिओ यांनी सांगितले.
याप्रसंगी नगर तालुका पंचायत समितीचे सभापती संदीप गुंड, गटविकास अधिकारी सचिन घाडगे,ग्रामसेवक मनीष लोखंडे, प्रसाद पवार,जालिंदर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी गुंड, सचिन शिंदे,ग्रामपंचायत सदस्य अशोक कांडेकर,गायकवाड, नितीन शिंदे,पारगाव ग्रामपंचायत सदस्य गणेश गुंड,विक्रम शिंदे, दत्ता शिंदे,बबन वैराळ,दिलीप गुंड,युवा सेना तालुका उपाध्यक्ष वैभव शिंदे,बबन शिंदे सर, जयदीप गुंड,भाऊसाहेब शिंदे, दत्तात्रय तनपुरे,दिलीप शिंदे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.कोरोना महामारीत सर्वसामान्य लोकांसाठी बॉस्को ग्रामीण विकास केंद्र व सभापती संदीप गुंड करत असलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.


सोहेल मनियार पत्रकार 9284856967

No comments:

Post a Comment