Tuesday, May 25, 2021

जि.प.सदस्य तथा उपजिल्हाप्रमुख यांनी रुग्णवाहिका स्वतः चालवत आरोग्य केंद्रास पोहोच केली.

 



टाकळी काझी ता.नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या विशेष प्रयत्नातून रुग्णवाहिका देण्यात आली. त्यांनी ती स्वतः चालवत पोहोच केली.
( छाया सोहेल मनियार,चिचोंडी पाटील )

नगर तालुक्यातील टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्राला,शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या विशेष प्रयत्नातून ॲम्बुलन्स देण्यात आली आणि ही रुग्णवाहिका स्वतः संदेश कार्ले यांनी चालवत टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्राला पोहोच केली.जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी विशेष प्रयत्न करून ही रुग्णवाहिका टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्रास दिल्याने, या रुग्णवाहिकेचा लाभ, रुग्णांना निश्चितच  मोठ्या प्रमाणात होणार आहे. नगर जामखेड राज्यमार्गावरीलटाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकेची अडचण दूर झाली आहे. लोकांच्या अडचणी दूर करून सर्वसामान्य गोरगरीब जनता व शेतकऱ्यांचा नेता म्हणून आपली ओळख संदेश कार्ले यांनी निर्माण केली आहे. खूप दिवसापासून रुग्णवाहिकेची असलेली अडचण दूर होऊन,रुग्णवाहिकेची मागणी पूर्ण केल्याबद्दल टाकळी काझी व परिसरातील तसेच नगर तालुक्यातील ग्रामस्थांनी संदेश कार्ले यांचे याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच संदेश कार्ले यांनी रुग्णवाहिका स्वतः चालवत प्राथमिक आरोग्य केंद्रा पर्यंत पोहोचत केल्याने तो कौतुकाचा विषय ठरला आहे.

( सोहेल मनियार पत्रकार 9284856967 )



No comments:

Post a Comment