नवी नियमावली लवकरच
मुंबई (प्रतिनिधी)
जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात १ जून नंतर लॉकडाऊन सुरूच राहील.पण निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची चर्चा करतील, त्यानंतर एक-दोन दिवसात नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत.प्रत्येक जिल्हानिहाय निर्बंध वेगवेगळे असतील असे सूत्रांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतेक मंत्र्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन कायम ठेवावा.पण निर्बंध शिथिल करावे अशी भूमिका मांडली.
राज्याचे अर्थचक्र सुरू ठेवायचे असेल तर कडक लॉक डाऊन परवडणार नाही निर्बंधांमुळे व्यापारावर विपरीत परिणाम झाला असून लोक आता लॉक डाऊन नको असे म्हणत आहेत. व्यापारीवर्गचाही मोठा दबाव आहे त्यामुळे कडक लॉक डाऊन बाबत फेरविचार करण्याची विनंती मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
निर्बंध कमी कसे करता येतील या संदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पत्रकारांना सांगितले की निर्बंध शिथिल केले जातील पण लॉक डाऊन सरसकट उठविला जाणार नाही.
सकाळी सात ते दुपारी एक
सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली जाईल सुरुवातीला धार्मिक,सांस्कृतिक,सामाजिक कार्यक्रमावर बंदी घातलेली कायम राहील.
रेस्टॉरंट बंद राहतील पण पूर्वीप्रमाणे होम डिलिव्हरी सुरू असेल. सिनेमागृहे,नाट्यगृहे बंद असतील.
मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची अनुमती नसेल.
प्रमुख शहरात कोरोणाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी सिंधुदुर्ग,नंदुरबार, बीड, परभणी ,हिंगोली,वर्धा, वाशिम,चंद्रपूर, नांदेड,अमरावती, यवतमाळ व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण अधिक आहे
१५ जिल्हे रेड झोनमध्ये
बुलढाणा,अकोला, वाशिम, यवतमाळ ,अमरावती ,गडचिरोली, अहमदनगर ,कोल्हापूर ,सांगली सातारा,सोलापूर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, बीड ,उस्मानाबाद हे पंधरा जिल्हे कोरोनाच्या दृष्टीने रेड झोन मध्ये आहेत त्यांच्याबाबत निर्बंध स्वरूप वेगळे राहील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
सोहेल मनियार पत्रकार 9284856967
No comments:
Post a Comment