राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधितांची नोंद:-
राज्यात आज 86 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.आतापर्यंत 2845ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात झाली आहे. त्यापैकी 1454 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 36 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद :-
राज्यात आज 36 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.88 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 70 लाख 89 हजार 936 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.09 टक्के आहे. सध्या राज्यात 14 लाख 35 हजार 141 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3402 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 35 लाख 11 हजार 861 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment