Monday, January 24, 2022

श्री.अभिजित खोसे यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड

 

अभिजित खोसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदी  नियुक्ती करण्यात आली.या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.श्री.जयंत पाटील यांनी दिले. (छाया : सोहेल मनियार)

लोकमन महाराष्ट्र न्यूज

अहमदनगर(प्रतिनिधी):- 

राष्ट्रवादी भवन मुंबई येथे अहमदनगर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.अभिजित खोसे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदी  नियुक्ती करण्यात आली.

या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना.श्री.जयंत पाटील  यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस श्री.शिवाजीराव गर्ज, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, शहर जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.माणिकराव विधाते, महिला जिल्हाध्यक्षा रेश्माताई आठरे ग्रामिणचे जिल्हाध्यक्ष श्री.राजेंद्र फाळके, ग्रामिणचे जिल्हा कार्याध्यक्ष श्री.संदिप वर्षे, महिला पक्षनिरिक्षक डॉ. वैशालीताई शिवणे युवक जिल्हा निरिक्षक श्री.किशोर मासाळ, युवक जिल्हाध्यक्ष श्री.कपिल पवार, कार्याध्यक्ष श्री.संजय कोळगे आदी उपस्थित होते. सर्वसामान्यांचे हक्कासाठी व गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नुतन जिल्हा कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांनी केले.

श्री.अभिजित खोसे हे गेल्या ६ वर्षापासुन आमदार श्री.संग्राम जगताप यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पहात होते. 

आमदार श्री.संग्राम जगताप यांचे नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हयाच्या प्रश्नांसाठी सतत रस्त्यावर उतरुन आंदोलने केली व त्याचा पाठपुरावा करुन जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला. 


विविध सामाजिक उपक्रम, पक्षाचे मेळावे, रक्तदान शिबिरे, विविध क्रिडा स्पर्धाचे आयोजन तसेच विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. या कामाची पावती म्हणुन उपमुख्यमंत्री मा.श्री.अजितदादा पवार व खासदार सौ.सुप्रियाताई सुळे यांनी अभिजित खोसे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पदी काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिली. 


याबददल श्री.अभिजित खोसे यांचे आमदार श्री.अरुणकाका जगताप व आमदार श्री.संग्राम जगताप यांनी कौतुक केले.


श्री.अभिजित खोसे यांनी या पुढील काळात या पदाच्या माध्यमातुन असेच जिल्हाभर काम सुरु ठेवुन पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीन व जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यास मदत करीन असे सांगितले.



लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

No comments:

Post a Comment