Monday, January 10, 2022

पिशवीतील भेसळयुक्त दूधामुळे 87 टक्के भारतीय लोक 2025 पर्यंत कॅन्सर ने ग्रस्त होतील. WHO

 

लोकमन महाराष्ट्र न्यूज

दिल्ली(प्रतिनिधी):


 ही माहिती व  अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने दर्शविला आहे. आतापर्यंत जे कॅन्सरग्रस्ताचं प्रमाण वाढले आहे, त्यातही भेसळयुक्त दूध मुख्य कारणीभूत आहे. भारतातील ८७ टक्के भारतीय लोक २०२५ पर्यंत कॅन्सर ग्रस्त होतील." हा जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज, खुपचं धक्कादायक आहे. ८७ टक्के लोकांना कॅन्सर होईल, याचा अर्थ काय? पिशवीतील कोणतेही दूध आरोग्यासाठी घातक आहे, किंवा त्यात भेसळ आहे, हे नक्की का? असा सवाल निर्माण झाला आहे. या WHO सर्वेक्षण अहवालात, यास पिशवीतील दूध कारणीभूत आहे, असं दर्शविले आहे. आपण जे रोज खातो-पितो ते स्लोपॉयझन तर नाही ना? याची खात्री करण्याची आज गरज निर्माण झाली आहे. अशी भेसळ अनेक पदार्थांमध्ये आजकाल सर्रास होत आहे. जनतेच अज्ञान

व जागरूकतेचा अभाव यास कारणीभूत आहे. जागो ग्राहकचा नारा, आजकाल खुपचं शांत झाला आहे. पारखून खाणं, पारखून पिणं विसरून माणूस आज आळसी बनला आहे. खाणं हे शरीरासाठी असतं, जिभे साठी नाही. जिभेच चोचले पुरवणे, सत्य शोधण्याचा व स्वीकारण्याचा कंटाळा, तसेच 


नफ्यासाठी कोणत्याही स्तरावर जाणारे निर्दयी कंपन्या व राजकारण्यांवर अंधविश्वास ठेवणारे आपणच यास कारणीभूत आहेत. स्वतःच व कुटुंबाच आरोग्य जपण्यासाठी जागरूक व्हा! थोडेच खा, पण चांगले व शुद्ध खा!

पिशवीतील दूधात युरीया, वॉशिंग पावडर तसेच दूध लवकर खराब होऊ नये, म्हणून मृतदेह सडू नये यासाठी वापरली जाणारी रासायनिक पावडर वापरली जाते. हे सर्वाधिक घातक आहे. सर्वांनी भेसळयुक्त दुधाचा वापर टाळा.

लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

No comments:

Post a Comment