Monday, January 10, 2022

साबलखेड ते आष्टी व चिंचपूर ते जामखेड २० किमी सिमेंट रस्त्यासाठी १५८ कोटी ३६ लक्ष मंजूर- आ. बाळासाहेब आजबे ; ना. गडकरी व आ. आजबे यांच्या भेटीचे फलित..

 


लोकमन महाराष्ट्र न्यूज

आष्टी (प्रतिनिधी ) -


आष्टी तालुक्यातुन जात असलेला नगर ते बीड राष्ट्रीय महामार्ग क्र. ५६१ गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यांनी भरला होता या रस्त्यावर वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी आपण मागील काही दिवसापूर्वी रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन नगर ते बीड रस्त्याबाबत प्रश्न मांडला होता त्याच भेटीचे फलित म्हणून केंद्रीय रस्ते विकास मंत्री ना. नितीन गडकरी यांनी साबलखेड ते आष्टी व चिंचपूर ते जामखेड

या १० कि. मी रुंदीच्या २० किलोमीटर अंतराच्या सिमेंट रस्त्यासाठी १५८ कोटी ३६ लाख ९६ हजार ७६५ रुपये निधी मंजूर केला आहे, त्याबद्दल ना. नितीन गडकरी यांचे आपण आष्टी मतदार संघाच्या वतीने आभार मानत असून लवकरच या कामाच्या निविदा प्रसिद्ध होणार असल्याचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

आजबे म्हणाले की मागील काही दिवसापूर्वी आपण रस्ते विकास मंत्री ना. नितीनजी गडकरी साहेब यांची भेट घेऊन नगर बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ व मतदार संघातील इतर रस्त्याबाबत चर्चा केली होती त्यामध्ये प्रामुख्याने सावलखेड ते आष्टी व चिंचपूर ते जामखेड हा रस्ता नेहमीच खराब होत असल्याने या ठिकाणी २०

किलोमीटर अंतराचा सिमेंट रस्ता व्हावा अशी आपण पत्राद्वारे मागणी केली होती त्या मागणीला नामदार नितीन गडकरी यांनी मंजुरी देत या २० किलोमीटर अंतराच्या सिमेंट रस्त्याच्या कामासाठी १५८ कोटी ३६ लाख ९६ हजार ७६५ रुपये निधी मंजूर केला असून सायलखेड ते आष्टी व चिंचपूर ते जामखेड हा २० की भी अंतराचा रस्ता १०मी रुंदीचा सिमेंट काँक्रेट होणार असल्याने या भागातील रस्त्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होणार आहे, नगर आष्टी जामखेड बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ मधील सावलखेड ते आष्टी व चिंचपूर ते जामखेड या दहा मीटर रुंदीच्या वीस किलोमीटर अंतराच्या सिमेंट रस्त्यासाठी मान्यता मिळाली असून उर्वरित नगर ते बीड हा रस्ता ही टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटचा होणार आहे, याच रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठीची ही मागणी आपण त्याच वेळी नामदार नितीनजी गडकरी यांच्याकडे केली होती तेही काम आता पूर्ण झाले असून याच रस्त्यावरील सिमेंट काँक्रीटच्या कामाच्या निविदा लवकरच प्रसिद्ध होऊन

 प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचेही आमदार बाळासाहेब आजबे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, आपण केलेल्या मागणीचा नामदार नितीन गडकरी यांनी सकारात्मक विचार करून हा रस्ता मंजूर करून दिल्याबद्दल आपण केंद्रीय रस्ते विकास मंत्री नामदार नितीन गडकरी यांचे आष्टी मतदार संघाच्या सर्व जनतेच्या वतीने आभार मानत आहोत. मतदारसंघातील इतर रस्त्याबाबतही आपण नामदार नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय विकास मार्ग निधी अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी निधीची मागणी केली असून त्या रस्त्यानाही लवकरच मंजुरी मिळेल, असे शेवटी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.


लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

No comments:

Post a Comment