Thursday, January 13, 2022

जाणून घ्या मकर संक्रात महाराष्ट्र महती

 

अहमदनगर (प्रतिनिधी):-


मकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. सौर कालगणनेशी संबंधित असा हा महत्त्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात.


महाराष्ट्रामध्ये हा सण तीन दिवस    साजरा केला जातो. या 3 दिवसांमध्ये संक्रांतीच्या अगोदरच्या दिवशी भोगी, भोगीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि संक्रांतीच्या किंक्रांत अशी नावे देण्यात आली आहेत. संक्रांतीस सर्व जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे सांगून प्रेम आणि चांगली भावना वाढीस लागण्यास शुभकामना दिली जाते.

या दिवसापासून रात्र लहान आणि दिवस मोठा होत जातो.


बारा राशींमधील एक मकर रास आहे, सूर्य एका राशिमधून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रमण त्यालाच संक्रांती असे म्हटले जाते. त्याचबरोबर मकर संक्रांती दिवशीच सूर्य धनु राशीतुन मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे या सणाला मकर संक्रांती असे म्हटले जाते.
या दिवसा अगोदर रात्र मोठी असते दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवास मोठा होत जातो. या दिवसा पासून थंडी कमी होऊन गर्मीचे दिवस सुरू होतात.

लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967





No comments:

Post a Comment