मुंबई (प्रतिनिधी):-
मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आज केंद्रीय आयु मंत्रालयने सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हे देखील सहभागी झाले होते.
दरवर्षी 14 जानेवारीला मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवशी सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतो . या दिवसापासून उत्तरायण सुरू होते असे म्हटले जाते. याच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर आज केंद्रीय आयुष मंत्रालयने सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सुर्यनमस्काराच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हे देखील सहभागी झाले होते. या कार्यक्रमात देश विदेशातील 75 लाख लोक सहभागी झाल्याची माहिती सर्बानंद सोनोवाल यांनी दिली आहे.
याबाबत आयुष मंत्रालयाने सांगितले की, सूर्याच्या प्रत्येक किरणांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सूर्याला नमस्कार म्हणून 'सूर्य नमस्कार' केले जात आहेत. कारण सूर्य सर्व सजीवांचे पोषण करतो असे मंत्रालयाने म्हटले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून, सूर्यनमस्कार रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी आणि जीवनशक्ती सुधारण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. सध्या देशावर कोरोनाचे मोठे संकट आहे. याकाळात प्रत्येकाच्या आरोग्यासाठी सूर्यनमस्कार फायदेशीर असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच सूर्यप्रकाशापासून मानवी शरीराला ड जीवनसत्व मिळत आहे. हे जगभरातील वैद्यकीय शाखांमधील सशोधनातून स्पष्ट झाले असल्याचे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे.
सामूहिक सूर्यनमस्काराच्या माध्यमातून हावामान बदलाचा सामना करणे आणि ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे. आजच्या जगात, हवामान बदल ही एक जागतीक समस्या तयार झाली आहे. त्यामुले याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच दैनंदिन जीवनात सौर ई-ऊर्जा वापरल्याने पृथ्वीला धोका निर्माण करणाऱ्या कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होईल असेही मंत्रालयाने म्हटले आहे. याशिवाय, हा कार्यक्रम आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशात मकर संक्रांतीचे महत्त्व अधोरेखित करेल असेही मंत्रालयाने म्हटले आहे.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment