Sunday, January 9, 2022

कोरोना लसीचा आजपासून मिळणार तिसरा डोस ; अशी करा नोंदणी

 


लोकमन महाराष्ट्र न्यूज 


नवी दिल्ली : (प्रतिनिधी)

सोहेल मनियार

सध्या कोरोनाने सर्वत्रच हाहाकार माजवला आहे.कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे देशासह राज्यभरात चिंतेचे वातावरण आहे. त्याच पार्शवभूमीवर भारतात आजपासून प्रिकॉशन म्हणजे लसीचा तिसरा डोस दिला जाणार आहे. यामध्ये सुरुवातीला कोरोना योद्धे म्हणजेच आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन कर्मचारी यांचा समावेश आहे. याशिवाय ६० वर्षांवरील जास्त वय असलेले आणि गंभीर आजार असलेल्या ज्येष्ठ यांना हा तिसरा डोस दिला जाणार आहे.


ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे सध्या संसर्ग वाढला आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी प्रिकॉशन म्हणून हा डोस दिला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ख्रिसमसच्या दिवशी याची घोषणा केली होती. महत्वाचं म्हणजे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा येथे निवडणूक ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनाही फ्रंटलाइन कर्मचारी ठरवले गेले आहे.

प्रिकॉशन डोस कोणाला मिळेल?

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन कर्मचारी, पोलीस आणि ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे ज्येष्ठ नागरिक.

सरकारने बूस्टर डोस हा ऐच्छिक ठेवला आहे. ज्यांना आवश्यक आहे, त्यांनी तो घ्यावा. सर्व ज्येष्ठांना प्रिकॉशन डोस बंधनकारक केलेला नाही.

दुसऱ्या डोसनंतर किती दिवसांनी प्रिकॉशन डोस घेता येईल?

ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे आणि तो घेतल्यापासून ९ महिने उलटून गेले आहेत त्यांना हा प्रिकॉशन डोस घेत येईल.

प्रिकॉशन डोससाठी नोंदणी कशी करावी?


यासाठी सर्वप्रथम तुम्हाला www.cowin.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.

दुसरा डॉस घेतलेल्यानी Co-WIN पोर्टलवर (www.cowin.gov.in) जाऊन स्लॉट बुक करावा.

Cowin कडून संदेश मिळाल्यानंतर लस केंद्राची निवड करवी.

त्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक भरावा लागेल. एक OTP येईल. तिथे भरल्यानंतर तुम्हाला आता ९ महिने झाले आहेत की नाही हे दाखवले जाईल.

त्याच वेळी प्रमाणपत्र डाउनलोडचा पर्याय देखील दिसेल. ते डाउनलोड करा आणि तुमच्या मोबाइलमध्ये ठेवा.

अशा प्रकारे तुम्ही बूस्टर डोससाठी नोंदणी करू शकता.

सुरक्षित राहा.

लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

No comments:

Post a Comment