राज्यात कोरोना संसर्ग मोठ्याप्रमाणावर वाढत आहे. कोरोनाची तिसरी लाट आल्याचं दिसून येत आहे. कोरोना बरोबरच राज्यात दररोज ओमायक्रॉनचे नवीन रुग्ण देखील आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कडक निर्बंध लावले जात आहेत. मात्र तरी देखील रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. आज दिवसभरात राज्यात ४४ हजार ३८८ नवीन कोरोनाबाधित तर २०७ ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. याशिवाय, राज्यात आज दिवसभरात १२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.
राज्यात आज दिवसभरात १५ हजार ३५१ रूग्ण कोरोनामुक्त देखील झाले आहेत. तर, राज्यातील अँक्टिव्ह केसेसची संख्या २,०२,२५९ आहे व आजपर्यंत राज्यात १, ४१, ६३९ कोरोनाबाधि रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. राज्यात आजपर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉन बाधितांची संख्या १ हजार २१६ झालेली आहे. या पैकी ४५४ जणांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment