पुणे (प्रतिनिधी):
पुणे, खडकी आणि देहूरोड कँटोन्मेंटसह देशातील सर्व कँटोन्मेंट हद्दीतून प्रवास करणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून वाहन प्रवेश शुल्क (व्हेईकल एन्ट्री फी) आकारणे थांबविण्याच्या सूचना संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण मालमत्ता विभागाने सर्व कँटोन्मेंट बोडांना दिल्या आहेत.
संरक्षण मालमत्ता विभागाचे सहायक महासंचालक (कँटोन्मेंट) दमण सिंग यांनी याबाबतचे पत्र लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाला आणि संरक्षण मालमत्ता विभागाच्या पुणे प्रधान संचालक कार्यालयाला पाठविले आहे. कँटोन्मेंट कायदा २००६नुसार वाहन प्रवेश शुल्क आकारणी केली जात होती. जीएसटी लागू झाल्यानंतर कँटोन्मेंट बोडांकडून 'एलबीटी' सह वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्यात आली. लष्कर भागातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांकडून २० ते ७० रुपयांचे प्रवेश शुल्क घेतले जात होते. मात्र, आता संरक्षण मालमत्ता विभागाने वाहन प्रवेश शुल्काची आकारणी बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे व्यावसायिक वाहनांची या कराच्या कचाट्यातून सुटका झाली आहे, तर जीएसटीचा वाटा मिळत नसल्याने हवालदिल असलेल्या कँटोन्मेंट बोर्डाची आर्थिक कोंडी आणखी वाढणार आहे.
संरक्षण मंत्रालयाने सर्व कँटोन्मेंट बोडांना वाहन प्रवेश शुल्क घेणे बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे कँटोन्मेंट बोर्ड आणखी आर्थिक अडचणीत येणार असून, कामगारांचा पगार खर्च भागविणेही अवघड होणार आहे.
-रघुवीर शेलार, माजी उपाध्यक्ष, देहूरोड कँटोन्मेंट बोर्ड.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment