Saturday, January 8, 2022

एकाच एकरात काढले तब्बल ९००० किलो कांद्याचं उत्पन्न; शेतकरी मालामाल

मुंबई : (प्रतिनिधी)

08 जानेवारी 2022 :–

 सध्या शेतकरी कांद्यास आर्थिक उत्पनाचे पीक म्हणून पाहतो. आज अनेक शेतकरी कांदा उत्पादनांकडे वळले आहेत.

सध्या बाजारात लाल कांद्याची आवक सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांनी लाल कांद्याची लागवड केली आहे.

परंतु एका शेतकऱयाने मोठी कमाल केली आहे. एकाच एकरात तब्बल 90 क्विंटल लाल कांदाचे उत्पादन या शेतकऱ्याने घेतले आहे.

राजेश मळसने असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी 17 रुपये किलोप्रमाणे त्यांनी त्यांचा कांदा शेतातून विकला.

त्यातून त्यांना 1 लाख 53 हजार रुपये मिळाले. कांदा पिकासाठी जवळपास 53 हजार रुपये खर्च केले होते.

खर्च वजा जाता त्यांना एका एकरात निव्वळ एक लाख रुपयांचा नफा मिळाला. राजेश मळसने हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील कापुसतळणी येथील शेतकरी आहे.

शेतकरी नेहमीच या ना त्या कारणाने संकटात सापडतो. त्यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होते.

परंतु योग्य नियोजनाने मातीतून सोने देखील पिकले जाऊ शकते हेच या शेतकऱ्याने सिद्ध केले आहे. सदर शेतकरी मागील अनेक वर्षांपासून पांढऱ्या कांद्याची लागवड करत होते.

परंतु अनेकदा अवकाळी पावसामुळे या कांद्याला फटका बसत होता. परंतु त्यांनी यावर्षी नाशिकचा लाल कांदा शेतात लावण्याचा निश्चय त्यांनी केला होता.

या वर्षी त्यांनी एक एकर शेतीवर खरीप हंगामात लाल कांद्याची लागवड केली होती. शेतात गोमूत्र, भरपूर शेणखत, गुणवत्तापूर्ण बियाणे, वेळेवर अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन, कीटकनाशकांचा योग्य वेळी वापर अशा त्रिसूत्रीच्या

तसेच वेळोवेळी फवारणी करून त्यांनी या वर्षी एक एकरात तब्बल 90 क्विंटल लाल कांद्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. राजेश मळसणे यांच्या या यशस्वी शेतीमध्ये त्यांना कृषी विभागाचे मोठे सहकार्य मिळाले.

कृषी सहाय्यक मारुती जाधव यांनी वेळोवेळी पाहणी करत मार्गदर्शन केले.


पत्रकार सोहेल मनियार 9284856967

No comments:

Post a Comment