अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने मागणी केलेले प्रलंबित प्रश्न सोडवणार शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची संघाच्या शिष्टमंडळाला ग्वाही.(छाया.सोहेल मनियार)
अहमदनगर(प्रतिनिधी):-
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतलेली असून या कोरोना १९ च्या संकटातही शिक्षक संघाने केलेले काम स्पृहनीय असून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत सरकार सकारात्मक भूमिका घेवून मागणी केलेले हे प्रलंबित प्रश्न सोडविणार अशी ग्वाही शिक्षण मंत्री ना.वर्षा गायकवाड यांनी संघाच्या शिष्टमंडळास दिल्याची माहिती राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे व राज्यसंघटक राजेंद्र निमसे यांनी दिली.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे यांच्या नेतृत्वा खालील शिष्टमंडळात राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य संघटक राजेंद्र निमसे , संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, शिवाजी इंगळे यांनी ना.वर्षाताई गायकवाड यांची मुंबई येथे भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शिक्षकांना रजारोखीकरणाचा लाभ वित्त विभागाची मंजुरी मिळताच देवू तसेच शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात संघटनेची बैठक घेवून निर्णय घेण्याचे आश्वासन वर्षा गायकवाड यांनी दिले.
शिक्षकांच्या जिल्हातंर्गत व आंतरजिल्हा बदल्यांविषयी निर्णय घ्यावा, याबाबतची मागणी ग्रामविकास विभागाचे उपसचिव का.गो.वळवी यांच्याकडे केली .राज्यातील करोना परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत असून बदल्या संबंधीच्या शिफारशी बदली अभ्यास गटाचे अध्यक्ष आयुष प्रसाद यांचेकडून प्राप्त झाल्या असून लवकरच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे समवेत सविस्तर चर्चा करून लवकरच बदल्यासंबंधी सर्वसमावेशक असा शासन निर्णय निर्गमित केला जाईल असे स्पष्ट आश्वासन ग्रामविकास विभागाचे उपसचिव का.गो.वळवी यांनी दिले .
शिक्षकांच्या वेतना संबधी सर्व जिल्हा परिषदांना सीएमपी प्रणाली लागू करावी. केंद्रप्रमुखांची पदे भरावीत. शिक्षकांसाठी आश्वासित प्रगती योजना लागू करावी, शाळास्तरावर अस्तित्वात असलेल्या विविध समित्यांचे समावेशीकरण करणे, बीएलओ बाबत फक्त प्राथमिक शिक्षकांचीच नेमणूक होत असल्याबाबतचा राज्यस्तरीय वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करणे ,राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या नैमित्तिक ( किरकोळ ) रजेचा वार्षिक कालावधी निश्चित करणे आदी मागण्याबाबत यावेळी चर्चा झाली.
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment