Sunday, February 13, 2022

शिवसेना जिल्हाप्रमुख गाडे सरांनी शिवसैनिकांना दिले आदेश : बाजार समितीचा भ्रष्टाचार लोकांसमोर मांडा


अहमदनगर(प्रतिनिधी):-

बाजार समितीच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सोसायटीची मते महत्त्वाची आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्याच ताब्यात येणार आहे. नगर तालुक्यातील बाजार समितीमधील भ्रष्टाचार गावोगावी जाऊन जनतेसमोर मांडा. त्यांच्या भ्रष्टाचाराची पत्रके गावोगावी वाटण्याचे आदेश शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात दिले.


शिवसेना पदाधिकाऱ्याची आज बाजार समिती निवडणूक, सेवा सोसायटीच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली.


या बैठकीला उपजिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य संदेश कालें, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, युवा नेते प्रवीण कोकाटे, संदीप गुंड, पंचायत समिती सदस्य व्ही. डी. काळे, रामदास भोर, गुलाब शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र भगत, विश्वास जाधव, प्रकाश कुलट यांसह  तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी हजर होते.


शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे म्हणाले, शेतकऱ्यांच्या सर्व संस्थाची वाट लागली आहे. तालुका सहकारी साखर कारखाना, दूध संघ शेतकऱ्यांचा राहिला नाही. बाजार समितीची जागा विकून मोठमोठे शॉप तयार झालेले दिसतात.



लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

No comments:

Post a Comment