Sunday, February 13, 2022

वीजमीटर रीडिंग चुकीची घेतल्यास काय कराल ?एजन्सीच्या विरोधात तक्रार करण्याची मुभा : ग्राहकांना दिलासा



लोकमन(प्रतिनिधी):-

जिल्ह्यात घरगुती, औद्योगिक व कृषी आदी वर्गवारीतील जवळपास अडीच लाख महावितरणचे ग्राहक आहेत. मात्र या ग्राहकांना चुकीच्या रीडाप्रमाणे बिले दिली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे आता चुकीची बिले आलेल्या ग्राहकांनी महावितरणकडे संबंधित एजन्सीची तक्रार केल्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वीज ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.


परभणीतील वीज वितरण कंपनीकडून जिल्ह्यातील १ लाख २१ हजार २५५ घरगुती ७ हजार २७६ वाणिज्य १ हजार ९९३ औद्योगिक यासह ९६ हजार ७२३ कृषीपंपधारकांना वीजपुरवठा केला जातो. यामध्ये जिल्ह्यातील ९६ हजार कृषीपंपधारकांकडे जवळपास १६०० कोटींची थकबाकी थकली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीच्या वतीने मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र ग्राहक त्यास प्रतिसाद देत नसल्याने थकबाकीचा डोंगर वाढत आहे. वीजग्राहकांकडून थकबाकी वसुलीसाठी महावितरणने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 


वीज वितरण कंपनीकडून हर घर दस्तक, कृषी  वाहिनी या वेगवेगळ्या मोहीम राबविण्यात आल्या. मात्र अनेक ठिकाणी वीजग्राहकांनी संबंधित एजन्सीकडून चुकीच्या रीडिंग घेत बिले दिली जात आहेत. त्यामुळे जोपर्यंत अचूक रीडिंग घेऊन बिले दिली जाणार नाही. तोपर्यंत बिले भरणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे महावितरण अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल यांनी ४ फेब्रुवारी रोजी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येक वीजमीटरवेरीडिंग शंभर टक्के अचूक झालेच पाहिजे.

चुकीच्या वीजविनामुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व महावितरणचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. अचूक रीडिंग घेण्यात हयगय तथा करणाऱ्या एजन्सीविरुद्ध महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी फौजदारी कारवाई सोबतच संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. त्यामुळे जिल्ह्यातील वीजग्राहकांना दिलासा मिळाला आहे.


रीडिंगबाबतची तक्रार कशी कराल?

एजन्सीकडून चुकीचे रीडिंग घेऊन बिले दिली तर त्यास ग्राहकांनी महावितरणकडे लेखी स्वरूपात किवा मोबाईल ॲपवरून तक्रार दाखल करावयाचे आहे.त्यानंतर वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून त्या तक्रारीची व दिलेल्या बिलाची शहानिशा करून संबंधित एजन्सी चुकीची असल्यास एजन्सीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.



लोकमन महाराष्ट्र न्यूज

पत्रकार सोहेल मनियार

9284856967

No comments:

Post a Comment