सहयोग प्रतिष्ठान आयोजित प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, समवेत संतोष शिंदे,गव्हाणे सर आदी..(छाया: सोहेल मनियार)
विकास सहयोग प्रतिष्ठान मार्फत बालहक्क संरक्षण या विषयावर शिक्षकांचे दोन दिवसांचे प्रशिक्षण संपन्न
अहमदनगर (प्रतिनिधी):-
विकास सहयोग प्रतिष्ठान प्लॅन इंडिया व इटॉन मार्फत या सामाजिक संस्थेच्या वतीने सुरू असलेल्या मॉडेल स्कुल प्रकल्पांतर्गत एमआयडीसी परिसरातील माध्यमिक व उच्च प्राथमिक १० शाळांमधील शिक्षकांसाठी बालहक्क संरक्षण या विषयावर दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित केले होते . या प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी अहमदनगर जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी बालकांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध राहण्याची सर्व प्राथमिक शिक्षकांना आवाहन केले .ते पुढे म्हणाले की बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी व त्याला गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे याकामी बालकांच्या हक्का बरोबरच त्यांच्या अधिकारांचीही माहिती शिक्षकांना असणे अगत्याचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .तसेच त्यांनी विकास सहयोग प्रतिष्ठान राबवत असलेल्या मॉडेल स्कूल प्रोजेक्टचेही भरभरून कौतुक केले.
या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे सदस्य संतोष शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.त्यांनी उपस्थित शिक्षकांना बाल हक्काची पार्श्वभूमी, बाल हक्क सनद चा इतिहास, बाल विकासातील पालकांची भूमिका,सामाजिक पालकत्व,शाळांमधील विद्यार्थ्यांचा हक्कांच्या संवर्धनातील शिक्षकांची भूमिका इत्यादी विषयांवर दोन दिवस सखोलपणे मार्गदर्शन केले तसेच त्यांनी बाल हक्क आयोग ,जिल्हा बाल कल्याण समिती, बाल न्यायालय, बालकांसाठी च्या कायदेशीर तरतुदी इत्यादी बद्दल देखील मार्गदर्शन केले.
श्री पाटील यांच्या समवेत माध्यमिक उपशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे , माध्यमिक विस्तार अधिकारी श्री पवार व श्री लोळगे , प्लॅन इंडिया चे चंद्रप्रकाश अरुण आणि ॲड. अदिती पांडे या उपस्थित होत्या.
या प्रशिक्षण शिबिराच्या यशस्वीतेसाठी विकास सहयोग प्रतिष्ठान चे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन सुर्वे,राज्य कार्यक्रम व्यवस्थापक राहुल खडसे , शिक्षण तज्ञ संदीप धोटे,जिल्हा प्रकल्प अधिकारी दिलीप खांडरे, समुदाय समन्वयक रामेश्वर राऊत, भारती मात्रे व संस्थेतील इतर पदाधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले.
या बाल हक्क प्रशिक्षणामध्ये माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांचा सहभाग होता .या प्रशिक्षणामध्ये बालकांचे हक्क व त्यांचे अधिकार याबाबत प्रशिक्षणार्थी म्हणून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यसंघटक राजेंद्र निमसे मुख्याध्यापक पोपट धामणे, विज्ञान शिक्षक सुखदेव पालवे प्रकाश गुंजाळ,राजेंद्र औटी, संजय सातपुते आदींनी प्रत्यक्ष संवादात सहभाग घेतला या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लॅन इंडिया चे रिजनल हेड चंद्रप्रकाश अरुण यांनी केले तसेच आभार प्रदर्शन जिल्हा प्रकल्प अधिकारी दिलीप खांडरे यांनी केले .संपूर्ण प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालन विकास सहयोग प्रतिष्ठान चे राज्य कार्यक्रम व्यवस्थापक राहुल खडसे यांनी केले .
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment